Breaking News

जे.पी.दत्ता पुन्हा मनामनांत जागवणार राष्ट्रभक्ती पलटनच्या निमित्ताने आणखी एक युध्दपट

मुंबईः प्रतिनिधी

प्रत्येक दिग्दर्शकाची चित्रपट बनवण्याची आपली एक शैली असते. कोणी वास्तवदर्शी चित्रपट बनवण्यासाठी ओळखला जातो, तर कोणी फँटसीसाठी फेमस असतोकोणी बड्या स्टारकास्टसह रुपेरी पडद्यावर ग्लॅमर आणण्यात मग्न असतो, तर कोणी प्रकाशझोतात न आलेल्या कलाकारांनाही चान्स देत वेगळा प्रयत्न करतोकोणी इतिहासावर, तर कोणी राजकारणावर सिनेमे बनवतो. या सर्वांपेक्षा काही दिग्दर्शक असे आहेत ज्यांचं नाव घेता क्षणीच देशभक्तीपर चित्रपटांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. याबाबतीत सध्या आघाडीवर असलेले दिग्दर्शक म्हणजे जे. पी. दत्ता. ‘सरहद’, ‘बॅार्डर’, ‘रिफ्युजी’, ‘एलओसी कारगिल’ आदी देशभक्तीपर चित्रपट बनवणारे दत्ता सध्या ‘पलटन’ या आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहेत.

या चित्रपटाच्या माध्यमातून ते जणू पुन्हा एकदा मनामनांत देशभक्तीची ज्योत जागविण्यासाठी सज्ज झाले आहेत. दत्तांच्या ‘पलटन’ मध्येही देशभक्तीपर गीत असणार आहे. या गीताचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण करण्यात आलं आहे. हे गीत भारतीय सैन्यातील जवानांच्या पराक्रमाला समर्पित असल्याचं सांगण्यात येत आहे. सोनू सूद, अर्जुन रामपाल, हर्षवर्धन राणे, लव सिन्हा, सिध्र्थ कपूर, गुरमित चौधरी आणि जॅकी श्रॅाफ या कलाकारांवर चंदिगढमध्ये हे गीत चित्रीत करण्यात आलं. प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर यांनी हे गीत लिहिलं असून, संगीतकार अनु मलिक यांनी संगीतबध्द केलं आहे. यापूर्वी रसिकांनी ‘बॅार्डर’ आणि ‘एलओसी कारगिल’ या चित्रपटांमधील गीतांमध्ये अख्तर आणि मलिक यांच्या गीतसंगीताची जादू अनुभवली आहे. ‘पलटन’च्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकत्र आल्याने नवीन काहीतरी अनुभवायला मिळेल अशी आशा आहे. ‘बॅार्डर’मधील ‘संदेसे आते हैं…’ या गीताप्रमाणे ‘पलटन’ मधील देशभक्तीपर गीतही संगीतप्रेमींच्या ओठांवर सहज रुळणारं असल्याचं चित्रपटाशी निगडीत असलेल्या सूत्रांचं म्हणणं आहे. जे.पी. फिल्म्सची निर्मिती आणि झी स्टुडिओजची प्रस्तुती असलेला हा चित्रपट यंदा उन्हाळ्यात प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *