Breaking News

वाघ, बिबटे, हरिण, काळवीटांसह वन्यप्राण्यांची काळजी घ्या वनमंत्री संजय राठोड यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील एका प्राणिसंग्रहालयातील वाघाला कोरोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवरराज्यातील प्राणी संग्रहालयामध्ये व वन्य प्राणी बचाव केंद्रामध्ये अधिक दक्षता घेण्यात यावी व केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. 

राज्यात विविध जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अखत्यारित येत असलेल्या प्राणीसंग्रहालय किंवा वन्यप्राणी बचाव केंद्राशी तातडीने संपर्क साधून त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करावे. आवश्यकतेनुसार विलगीकरण करावे. कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करावी. प्राणीसंग्रहालय किंवा वन्यप्राणी बचाव केंद्रातील प्राण्यांना संसर्ग आहे किंवा कसे याबाबत खात्री करण्यासाठी संबंधित यंत्रणेशी त्वरित संपर्क साधून नमुना तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले.

कोणत्याही परिस्थितीत किमान आवश्यक मनुष्यबळ वगळता प्राणिसंग्रहालय किंवा वन्यप्राणी बचाव केंद्राच्या आत मानवी वावर वाढवू नये अशी सूचना त्यांनी केली.

राज्यात मुंबईतील बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व प्राणी संग्रहालयभायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय,  पुण्यातील कात्रजमधील राजीव गांधी वन्यप्राणी संग्रहालय व संशोधन केंद्रचिंचवडमधील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयऔरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालयसोलापुरातील महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान व प्राणी संग्रहालयनागपूरमधील महाराजबाग प्राणीसंग्रहालयकोल्हापुरातील महाराजा शहाजी छत्रपती प्राणी संग्रहालयढोलगरवाडीतील शेतकरी शिक्षण मंडळ सर्पोद्यान, नागपूरमधील गोरेवाडा येथील वन्यप्राणी बचाव केंद्रमाणिकडोह जुन्नरमधील बिबट बचाव केंद्रवर्ध्यातील पीपल फॉर ॲनिमल शेल्टर हाऊस आणि हेमलकसा (जि. गडचिरोली) येथील आमटेज्  ॲनिमल पार्कवन्यप्राणी बचाव केंद्र अशी एकूण 13 प्राणीसंग्रहालय व वन्य प्राणी बचाव केंद्रे आहेत.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *