Breaking News

missionbeginagain च्या २ ऱ्या टप्प्यात हे आहेत नवे नियम मास्क आणि किमान ६ फुटाचे अंतर बंधनकारक

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोना विषाणूला आणखी मोठ्या प्रमाणावर रोखण्यासाठी missionbeginagain चा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. या टप्प्यात शासकिय कार्यालयांमध्ये १५ टक्केपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालये चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच मद्यविक्रीला ऑनलाईन किंवा इतर पध्दतीने विक्री करण्याची परवानगी देण्यात आली असून या २ ऱ्या टप्यात खालीलप्रमाणे नियम राहणार आहेत.
१) घराबाहेर पडताना, कार्यालयात, सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक.
)शाररीक अंतर (सोशल डिस्टनसिंग)- सार्वजनिक ठिकाणी किमान ६ फुटाचे अंतर वैयक्तीकस्तरावर राखणे बंधनकारक. दुकानासमोरही इतक्याच अंतर पाळणे बंधनकारक.
३) सार्वजनिक कार्यक्रम आणि जाहीर कार्यक्रमांवर बंदी कायम. मात्र लग्न समारंभ किंवा या पध्दतीचे, अंत्यसंस्कार आणि त्याच्याशी निगडीत कार्यक्रमांना फक्त ५० नागरिकांना उपस्थिती बंधनकारक.
४)सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू खाण्यास बंदी.
अतिरिक्त सवलती
५) सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी घालण्यात आली असून असे कोणी करताना आढळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत दंडाची आकारणी करणार.
६) वर्क फ्रॉम होम- उद्योग, व्यवसाय, दुकानाची कामे, उद्योग व व्यावसायिक कामांना आस्थापनांनी घरी बसून काम करण्यास परवानगी द्यावी.
७) प्रत्येक इमारत, कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर किंवा बाहेर पडण्याच्या मार्गावर सॅनिटायझरची व्यवस्था करणे बंधनकारक. तसेच प्रत्येकाची थर्मल स्क्रिनिंग करणेही बंधनकारक.
८) कामाच्या ठिकाणी किंवा सामाईक वापराच्या गोष्टी सातत्याने सॅनिटाईज करणे बंधनकारक.
९) कामाच्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाप्रमाणे बसण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था आणि शिफ्टस असाव्यात.
अॅनेक्चर २-
मुंबई महानगर प्रदेश, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगांव, नाशिक, धुळे, जळगांव, अकोला, अमरावती आणि नागपूर या ठिकाणी सवलती देण्यासंदर्भात वेळोवेळी आदेश जारी केले जातील.
पूर्वीप्रमाणेच दुकानांच्या वेळा राहतील.
अनावश्यक वस्तुंची सुरु असलेली दुकानांनाही यापूर्वी दिलेल्या सवलती आणि मार्गदर्शनानुसार सुरु राहतील. तसेच मॉल्स आणि कॉम्प्लेक्स हे बंदच राहतील. तसेच अनावश्यकसाठी असलेली मार्केटस् सकाळी ९ ते संध्याकाळी ५ यावेळेत सुरु राहतील.
दारूच्या दुकानांना परवानगी असेल तर त्यांनी पुर्वीप्रमाणे ऑनलाईन दारूची विक्री करावी किंवा इतर पध्दतीने विक्री करावी.
ऑनलाईन मार्केटमधून अनावश्यक -आवश्यक गोष्टींच्या विक्रीला मान्यता पूर्वीप्रमाणेच राहणार.
सर्व औद्योगिक कारखाने सुरु झाले असतील ते यापुढेही सुरुच राहतील.
सर्व कंस्ट्रक्शन साईट खुल्या राहतील आणि तेथील कामासही परवानगी दिली.
रेस्टॉरंटला देण्यात आलेली घरपोच सेवा देण्यास यापुढेही मान्यता राहील.
ऑनलाई-डिस्टन्सिंग लर्गिगला परवानगी
सर्व शासकिय कार्यालये (अत्यावश्यक सेवेतील महानगरपालिका, आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, एनआयसी, अन्न व नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके) सर्व कार्यालये १५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे.
खाजगी कार्यालये अद्यापही १० टक्के उपस्थित कर्मचाऱ्यांच्या क्षमतेत चालवायचे.
दुचाकी, चारचाकी, टॅक्सी, रिक्षा आदींच्या माध्यमातून प्रवास करताना यापूर्वी दिलेल्या परवानगीनुसारच सुरु राहतील.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *