Breaking News

मराठा आरक्षण : न्यायालयाच्या निर्णयावरून देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका प्रयत्नांवर पाणी फेरले गेल्याचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील सरकारने केलेल्या सर्व प्रयत्नांवर आजच्या सर्वोच्च न्यायालयाने पाणी फेरल्या गेले असून विद्यमान सरकारने सर्वांना विश्वासात घेवून कारवाई केली असती तर आरक्षण टिकविता आले असते. पण हे सरकार पहिल्यापासून आरक्षणाबाबत गंभीर नसल्याने ही वेळ आल्याची  टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी ठाकरे सरकारवर एका प्रसिध्दी पत्रकान्वये केली.

आमच्या सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दिवस-रात्र परिश्रम घेण्यात आले. तसेच मागासवर्ग आयोगाची स्थापना केली. आरक्षणाच्या लढ्याला कायदेशीर आधार दिला. उच्च न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल झाल्यानंतर प्रयत्नांची शर्थ करून हे आरक्षण वाचविले. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे व्यथित झाल्याची खंत व्यक्त करून राज्य सरकारने दाखविलेल्या बेपर्वाईचा आणि असंवेदनशीलतेचा परिपाक असल्याची टीका करत ७ महिने झाले परंतु अद्याप मागासवर्ग आयोगाची अद्याप स्थापना केली नसल्याचा आरोप त्यांनी केली.

तरीही आपण मराठा समाजाच्या प्रत्येक लढ्यात आपण त्यांच्यासोबत असून त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्नांची शर्थ करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *