Breaking News

बापटांच्या सांसदीय खात्याचा कार्यभार तावडेंकडे पुण्याचे पालक मंत्री पद चंद्रकांत पाटलांकडे

मुंबईः प्रतिनिधी
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिष बापट हे लोकसभा निवडणूकीत खासदार झाल्याने त्यांच्याकडील सांसदीय कार्यमंत्री पदाचा कार्यभार शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे सोपविण्यात आला. तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाचा कार्यभार पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मांटुंगा येथील षण्मुखानंद हॉल येथे झालेल्या खारीप आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
पुण्याचे पालकमंत्री पद ही खासदार गिरीष बापट यांच्याकडे होते. मात्र त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने हे पालकमंत्री पद मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले. सद्य परिस्थितीत पुणे बरोबरच कोल्हापूरचे पालकमंत्री पद त्यांच्याकडेच राहणार आहे. तसेच पाटील यांच्याकडील जळगांवचे पालकमंत्री पद काढून ते वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरिष महाजन यांच्याकडे सोपविण्यात आले. आता त्यांच्याकडे नाशिकबरोबरच जळगांवचेही पालकमंत्री पद राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदी अमित गोरखे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

Check Also

नाना पटोले यांचा टोला, भाजपाने चावी दिली तेवढेच बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाने दिलेली स्क्रिप्ट वाचण्यापलीकडे काहीही करु शकत नाहीत. काँग्रेसने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *