Breaking News

Tag Archives: jaykumar rawal

शिवाजी महाराजांशी संबधित गड-किल्ल्यासाठी उच्चाधिकार समिती राज्य मंत्रिमंडळाच्या टिपणीत सुधारणा

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या पर्यटनाबरोबरच महसूली उत्पन्नवाढीसाठी राज्यातील गड-किल्ले लग्न समारंभ, हॉटेल्स, पार्टीकरीता भाडेतत्वावर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र या निर्णयावर राज्यातील सर्वचस्तरातून टीकेची झोड उठल्याने अखेर राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबधित गड-किल्ल्यांना विकसित करण्यासाठी उच्चाधिकारीची स्थापना करत राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या टिपणीत सुधारणा करण्यात आल्याची माहिती हाती …

Read More »

चुकीच्या माहितीच्या आधारे टीका नको ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कोणत्याही किल्ल्यावर हॉटेल नसल्याचा भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांची सारवासारव

मुंबईः प्रतिनिधी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी पराक्रम गाजवलेल्या कोणत्याही ऐतिहासिक महत्त्वाच्या किल्ल्यावर हॉटेल होणार नाही. पर्यटन खात्यातर्फे विकासासाठी उपलब्ध करून देण्यात येणारे किल्ले हे कोणत्याही संरक्षित किल्ल्यांच्या यादीतील नाहीत, असे असताना विरोधकांनी चुकीच्या माहितीच्या आधारे टीका टिप्पणी करत असून ते जनतेमध्ये संभ्रम पसरवत असल्याची सारवासारव भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी शुक्रवारी …

Read More »

शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या वैभवशाली वारशाचा खेळ करु नका पवित्र गडकिल्ल्यांवर बाजार न मांडण्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांवर हेरिटेज पर्यटनाच्या नावाखाली हॉटेल, रिसॉर्टला परवानगी देण्याचा निर्णय संतापजनक आहे. शिवरायांच्या वैभवशाली वारसा स्थळांवर बाजार मांडून मराठी अस्मितेचा अपमान करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला दिला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने …

Read More »

राज्यात गुंतवणूकीची गरज मात्र सरकारकडून मोदींच्या प्रतिमा संवर्धनासाठी काश्मीरात रिसॉर्ट काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्रातील एमटीडीसी रिसॉर्टची अवस्था अत्यंत दयनीय असून राज्यामध्ये पर्यटन वाढीकरीता अधिक गुंतवणुकीची गरज आहे. मात्र महाराष्ट्राचे हित डावलून महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा मोदी सरकारच्या प्रतिमा संवर्धनाकरीता आणि काश्मीरबाबतचा मोदी सरकारचा निर्णय योग्य ठरविण्याकरीता काश्मीरमध्ये एमटीडीसीचे रिसॉर्ट बांधण्याचा निर्णय घेत जनतेचा पैसा खर्च केला जात असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

काश्मीरात रिसॉर्ट बांधणीसाठी महाराष्ट्र सरकार विकत घेणार जमीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर देशातील कोणत्याही जनतेला जमीन विकत घेण्याचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र सरकारची जम्मू-काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन त्यावर रिसॉर्ट बांधण्याची योजना असून सरकारच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला (MTDC) काश्मीर खोऱ्यात पहलगाम आणि दुसरे लेहमध्ये रिसॉर्ट बांधण्यासाठी जमिन …

Read More »

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीने इच्छुकांच्या आशा पल्लवित मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला पुन्हा उधाण

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीतील विजयाने भाजपमध्ये एकच उत्साह वाढला. त्यातच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याने या सर्वांना खुष करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर कोणतीच हालचाल झाली नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी राज्यपाल सी.विद्यासागर यांची भेट घेतल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित …

Read More »

बापटांच्या सांसदीय खात्याचा कार्यभार तावडेंकडे पुण्याचे पालक मंत्री पद चंद्रकांत पाटलांकडे

मुंबईः प्रतिनिधी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिष बापट हे लोकसभा निवडणूकीत खासदार झाल्याने त्यांच्याकडील सांसदीय कार्यमंत्री पदाचा कार्यभार शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे सोपविण्यात आला. तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाचा कार्यभार पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मांटुंगा येथील षण्मुखानंद हॉल येथे झालेल्या …

Read More »

मनरेगामधून आता पायाभूत सुविधांची निर्मिती रोहयो मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) राज्य अभिसरण आराखडा अंमलबजावणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार मनरेगा योजनेसोबत शासनाच्या इतर योजनांचा सहभाग घेऊन ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसह मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाणार …

Read More »