Breaking News

कॅग’च्या अहवालाने जलयुक्त शिवार योजनेतील फसवणुकीचा फुगा फुटला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची फडणवीसांवर टीका

मुंबई : प्रतिनिधी

कॅग’च्या अहवालाने मागील सत्ताधाऱ्यांच्या जलयुक्त शिवार योजनेतील फसवणुकीचा फुगा फुटला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कॅग’च्या अहवालावरून फडणवीसांवर टीका केली.

‘कॅग’चा अहवालही सांगतो की, भाजपच्या सर्व आश्वासनांप्रमाणे जलयुक्त शिवार योजनाही ‘मुंगेरीलाल के हँसीन सपने’सारखीच ठरली आहे. विरोधी पक्षात असताना जलयुक्त शिवार योजना उपयुक्त ठरणार नाही यात मोठा भ्रष्टाचार आहे असे आम्ही वारंवार सांगत होतो. मात्र जाहिरातीच्या जोरावर खोटा प्रचार केला जात होता असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Check Also

सहा हजार ग्रामपंचायतींत भाजपाला बहुमत मिळेल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला असून सध्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *