मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत. म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी अनिल डिग्गीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुणे येथील समाज कल्याण आयुक्त पदी असलेल्या प्रविण दराडे यांची उचलबांगडी करत त्यांच्या ठिकाणी प्रशांत नारनवरे यांची नियुक्ती करण्यात आली.
याशिवाय विवेक जॉन्सन अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांची नियुक्ती प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा आणि सहाय्यक जिल्हाधिकारी भंडारा या पदावर करण्यात आली.
अमित सैनि यांची विक्रीकर आयुक्त मुंबई या पदावरून महाराष्ट्र मेरिटाईम मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या रिक्त पदावर करण्यात आली. याशिवाय दिपक कुमार मीना यांची वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून गोंदियाच्या जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली. तर एस.राममूर्ती यांची राज्य खनिकर्म महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचालक पदावरून बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली आहे.