Breaking News

Editor

विधानसभा अध्यक्ष पदी कोण डॉ.नितीन राऊत, पृथ्वीराज चव्हाण की संग्राम थोपटे? काँग्रेसच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती सेलच्या अध्यक्ष पदी आता के. राजू यांची नियुक्ती

मराठी ई-बातम्या टीम विधानसभा अध्यक्ष पदासाठी पुढील आठवड्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. महाविकास आघाडीतील पद वाटपानुसार हे पद काँग्रेसच्या वाट्याला आलेले असले तरी या पदासाठी अद्याप काँग्रेसकडून उमेदवार जाहीर केलेला नसताना काँग्रेसच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती सेलच्या अध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांना आज मुक्त करण्यात आल्याची घोषणा …

Read More »

केंद्र सरकारला झुकविल्यानंतर शेतकरी उतरले निवडणूकीच्या रणमैदानात पंजाबमधील सर्व जागा लढविणार

मराठी ई-बातम्या टीम तब्बल १४ महिने अहिंसक पध्दतीने आणि ऊन-वारा-पाऊस झेलत आपला लढा सुरु ठेवत केंद्रातील मोदी सरकारला झुकविणाऱ्या शेतकऱ्यांनी आता निवडणूकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय जाहीर करत पंजाबमधील विधानसभेच्या सर्व जागा लढविण्याचा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री पदाचा उमेदवारही जाहीर केला आहे. पंजाबमध्ये आगामी होवू घातलेल्या विधानसभा निवडणूकीत उतरण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी …

Read More »

एसटीच्या तोट्याला नेमके कोण जबाबदार? समितीच्या अहवात आले हे उत्तर २०१७ पासून राज्याचे परिवहन विधेयक राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी प्रलंबित

मराठी ई-बातम्या टीम जवळपास दिड महिन्याहून अधिक काळ राज्यातील एसटी कर्मचारी संपावर ठाम असून विलिनीकरणाची मुख्य मागणी आहे. परंतु एसटी महामंडळाच्या वाढत्या आर्थिक नुकसानीला स्वत: एसटी महामंडळाचा एकाधिकारशाही कारभार आणि देशाचे राष्ट्रपती जबाबदार असल्याची माहिती सार्वजनिक उपक्रम समितीने विधिमंडळाला सादर केलेल्या अहवालात अप्रत्यक्ष नमूद केले आहे. राज्य सरकारचा अंगीकृत उपक्रम …

Read More »

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा इशारा, गती वाढली तर शेवटचा पर्याय… राज्यात निर्बंध लागू केल्यानंतर टोपे यांचा इशारा

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील मुंबई, पुणे नंतर आता सातारा, उस्मानाबाद आणि नागपूरात ओमायक्रॉनचे रूग्ण आढळून आल्यानंतर या विषाणूच्या गतीवर राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. जर ओमायक्रॉनच्या संसर्गाची गती वाढून जर तिसरी लाट आली आणि ऑक्सीजनची आवश्यकता ८०० मेट्रीक टनावर पोहोचल्यास राज्यात लॉकडाऊन लागू करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नसल्याचा इशारा आरोग्य …

Read More »

चंद्रकांत पाटलांचे उपमुख्यमंत्री पवारांना आवाहन, दरडावून नव्हे तर समजावून सांगा एसटी कर्मचारी संपाच्या पार्शवभूमीवर चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

मराठी ई-बातम्या टीम एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना दरडाऊन नव्हे तर समजाऊन सांगावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून त्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबरीचा दर्जा आणि सोई सुविधा द्यायलाच हव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. भारतरत्न अटलबिहारी …

Read More »

नीरव मोदीच्या रिदम हाऊसचा लिलाव होणार ईडीने केले होते जप्त

मराठी ई-बातम्या टीम देशातील बँकांची तब्बल १४ हजार कोटी रुपयांची फसवणूक करून परदेशात पळालेल्या नीरव मोदीच्या रिदम हाऊसचा येत्या काही दिवसांत लिलाव होणार आहे. ही मालमत्ता मुंबतील काळा घोडा येथे आहे. हे घर ७० वर्षे जुने आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ही मालमत्ता जप्त केली होती. रिदम हाऊस हे मुंबईचे आयकॉनिक …

Read More »

Hero MotoCorp च्या दुचाकी नवीन वर्षात महागणार दोन हजाराने वाढणार किंमत

मराठी ई-बातम्या टीम Hero MotoCorp ने नवीन वर्षात आपल्या दुचाकींच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनी ४ जानेवारी २०२२ पासून दुचाकींच्या किमतीत २,००० रुपयांनी वाढ करणार आहे. वाहनाच्या एक्स-शोरूमवर नवीन किंमती वाढवण्यात येणार आहेत. मात्र, कोणत्या मॉडेलमध्ये किती वाढ होईल याबाबत कंपनीने काहीही सांगितले नाही. अशा परिस्थितीत जर तुम्ही हिरोची …

Read More »

जानेवारीमध्ये १४ दिवस बँका बंद पण विविध राज्यांमध्ये काही दिवस तर देशभरात एकदाच

मराठी ई-बातम्या टीम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जानेवारी २०२२ च्या बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यानुसार जानेवारी २०२२ मध्ये १४ दिवस बँका बंद राहणार आहेत. जानेवारी २०२२ मध्ये बँकांना असणाऱ्या एकूण ११ दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये ४ सुट्ट्या रविवारी आहेत. यामध्ये अनेक सुट्टया जोडूनही येत आहेत. मात्र, संपूर्ण देशातील बँका १४ बंद राहणार नाहीत. आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यातील आहेत. या सर्व सुट्ट्या सर्व …

Read More »

राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागूः जमावबंदी सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत.  ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील. विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे. जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध …

Read More »

नाव जाहीर नाही मात्र शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड काँग्रेसकडून सध्या दोन नावांची चर्चा

मराठी ई-बातम्या टीम राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थानापन्न झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षाचे पद काँग्रेसला देत त्यावर नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने मागील आठ महिन्यापासून हे पद रिक्त असल्याने त्यासाठी निवडणूक घेण्यात येत आहे. मात्र या पदासाठी काँग्रेसकडून अद्याप उमेदवाराचे नाव …

Read More »