Breaking News

केंद्र सरकारला झुकविल्यानंतर शेतकरी उतरले निवडणूकीच्या रणमैदानात पंजाबमधील सर्व जागा लढविणार

मराठी ई-बातम्या टीम

तब्बल १४ महिने अहिंसक पध्दतीने आणि ऊन-वारा-पाऊस झेलत आपला लढा सुरु ठेवत केंद्रातील मोदी सरकारला झुकविणाऱ्या शेतकऱ्यांनी आता निवडणूकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय जाहीर करत पंजाबमधील विधानसभेच्या सर्व जागा लढविण्याचा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री पदाचा उमेदवारही जाहीर केला आहे.

पंजाबमध्ये आगामी होवू घातलेल्या विधानसभा निवडणूकीत उतरण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असून या निवडणूकीसाठी शेतकऱ्यांच्या २२ संघटना एकत्र आल्या आहेत. तसेच पंजाबमधील ११७ जागा लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांना पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणूनही शेतकऱ्यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी संयुक्त समाज मोर्चा ही नवी संघटना स्थापन केली आहे.

यापूर्वी ३२ संघटनांनी १८ डिसेंबर रोजी आपली भूमिका स्पष्ट केली होती की, आम्ही कोणत्याही निवडणुकीत उतरणार नाही. तसेच कोणत्याही पक्षाला पाठबळ देणार नाही. परंतु या३२ पैकी २२ संघटनांनी निवडणूका लढविण्याचा निर्णय घेतला असून ७ संघटनांनी त्यांच्यापासून फारकत घेत निवडणूक रिंगणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व संघटना शेतकरी आंदोलनात होत्या. लुधियानापासून २० किलोमीटरच्या अंतरावर मुल्लांपूर दाखा येथे एका संयुक्त बैठकीत कोणत्याही राजकीय पक्षांना पाठिंबा न देण्याचा आणि निवडणुका न लढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जाबमध्ये शेतकरी संघटनांनी विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिध्दू आणि तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यातील शत्रुत्वामुळे अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून दूर व्हावे लागले. त्यानंतर चन्नी यांची मुख्यमंत्री पदावर निवड करण्यात आली. काँग्रेसने केलेल्या या अपमानाचा बदला घेण्यासाठी अमरिंदर सिंग यांनी भाजपाशी जवळीक वाढविली असून त्यांनी नुकतेच स्वतंत्र राजकिय पक्षाची स्थापना करत निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.

पंजाबमधील निवडणूकीत आधीच आम आदमी पार्टी, कॅ.अमरिंदर सिंग यांनी काँग्रेससमोर आव्हान निर्माण केलेले असतानाच आता शेतकरी संघटनांनीही निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेससमोर बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या आगामी निवडणूकीत काँग्रेस आपली सत्ता राखण्यात यशस्वी होणार की नाही याबाबत उत्सकुता निर्माण झाली आहे.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *