Breaking News

Hero MotoCorp च्या दुचाकी नवीन वर्षात महागणार दोन हजाराने वाढणार किंमत

मराठी ई-बातम्या टीम

Hero MotoCorp ने नवीन वर्षात आपल्या दुचाकींच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनी ४ जानेवारी २०२२ पासून दुचाकींच्या किमतीत २,००० रुपयांनी वाढ करणार आहे. वाहनाच्या एक्स-शोरूमवर नवीन किंमती वाढवण्यात येणार आहेत. मात्र, कोणत्या मॉडेलमध्ये किती वाढ होईल याबाबत कंपनीने काहीही सांगितले नाही. अशा परिस्थितीत जर तुम्ही हिरोची दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ४ जानेवारीपूर्वी घेणे फायदेशीर ठरेल.

Hero MotoCorp ने सांगितले की, दुचाकींच्या एक्स-शोरूम किमती २,००० रुपयांपर्यंत वाढतील. वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे किमती वाढवणे अत्यावश्यक झाले आहे. Hero MotoCorp गेल्या ६ महिन्यांत तिसऱ्यांदा दुचाकींच्या किमती वाढवणार आहे. १ जुलै रोजी दुचाकींच्या एक्स-शोरूम किमतीत ३,००० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती. यानंतर २० सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा ३,००० रुपयांपर्यंत भाव वाढवण्यात आले. त्यावेळीही कंपनीने किमती वाढवण्यामागे वस्तूंच्या किमतीला जबाबदार धरले होते. दरम्यान, १ जानेवारी २०२२ पासून अनेक कंपन्या कारच्या किमती वाढवणार आहेत. यामध्ये स्वस्त हॅचबॅक निर्माता कंपनी मारुती, टाटा ते लक्झरी कार बनवणारी मर्सिडीज, ऑडी, स्कोडा यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत या महिन्यात कार खरेदी परवडणारी असेल. कारच्या किमती वाढण्यामागे कच्च्या मालाची किंमत हे कारण आहे. कच्चा माल आणि ऑपरेशनचा खर्च कव्हर करण्यासाठी किमती वाढवण्याची गरज असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.

मात्र, कंपन्यांनी अजून किती दर वाढवणार हे जाहीर केलेले नाही. तसेच, डिसेंबरच्या ऑफर अंतर्गत, मारुती ४५,००० रुपयांपर्यंत, Hyundai ५०,००० रुपयांपर्यंत, Tata ४०,००० रुपयांपर्यंत, Mahindra ६५ हजार रुपयांपर्यंत आणि Renault आपल्या कारवर १.३० लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. याशिवाय Honda, Nissan, Datsun, Skoda सारख्या सर्व कंपन्या चांगल्या डिस्काउंट ऑफर देत आहेत. यामध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सवलत यांसारख्या विविध ऑफर्सचा समावेश आहे. डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा महिना.

त्यानंतर २०२१ संपेल आणि २०२२ सुरू होईल. वर्ष संपले की कार उत्पादनाचे वर्षही बदलते. म्हणजेच २०२१ मध्ये जी कार तयार झाली आहे, तिचे मॉडेल वर्ष बदलताच एक वर्ष जुने होईल. आता जानेवारी २०२२ मध्ये कार खरेदी करणारे ग्राहक डिसेंबर २०२१ मध्ये उत्पादन कार खरेदी करणार नाहीत, कारण ती एक वर्ष जुनी मॉडेल मानली जाईल. या कारणास्तव बहुतेक कंपन्या डिसेंबरमध्ये कारचे उत्पादन थांबवतात. सर्व कार कंपन्यांना या वर्षी त्यांचा जुना स्टॉक काढायचा आहे. यामुळे डीलर्सही कारवर चांगली सूट देतात. सवलतींसोबत अॅक्सेसरीजही दिल्या जातात. मात्र, ज्या गाड्यांचा स्टॉक आहे त्यावरच सवलत उपलब्ध आहे. ग्राहकाला कारचे प्रकार निवडण्याची संधीही कमी असते.

Check Also

विमा दाव्याच्या सेटलमेंटमध्ये एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर कंपन्यांचा रेशो ९० टक्क्यांपेक्षा जास्त

मराठी ई-बातम्या टीम आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जीवन विमा कंपन्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त क्लेम सेटलमेंट केले आहे. यामध्ये देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय विमा नियामक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *