Breaking News

Editor

मुंबईसह राज्यातील सर्वच दुकानांच्या पाट्या आता मराठीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्राची राजभाषा म्हणून मराठी असली तरी राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात याबाबत राज्य सरकारकडून आग्रही भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे या मुद्यावरून कधी शिवसेना तर कधी मनसेकडून मुंबईसह राज्यातील सर्व ठिकाणी असलेल्या दुकानांच्या पाट्या मराठी अक्षरात असाव्यात याबाबत आग्रह धरण्यात येत होता. तसेच यासंदर्भात मनसे आणि शिवसेनेकडून वेळोवेळई …

Read More »

सरकारचा बस वाहतूकदारांना दिलासा: कोविडमुळे शालेय बसेससाठी करमाफी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मराठी ई-बातम्या टीम दुसऱ्या लाटेनंतर राज्यातील निर्बंध शिथील झाल्यानंतर पुन्हा एकदा शाळांची घंटा वाजण्यास सुरुवात झाली. त्यामुळे राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येत असलेल्या बस वाहतूकदारांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला. परंतु राज्यातील कोविड रूग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होण्यास सुरुवात झाल्याने राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक बस …

Read More »

सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी सेन्सेक्स ६१ हजारांच्या वर, ५३३ अंकांची नोंदवली वाढ

मराठी ई-बातम्या टीम या आठवडय़ातील तिसऱ्या दिवशीही शेअर बाजारात तेजी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५३३ (०.८८%) अंकांनी वाढून ६१,१५० वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५६ अंकांनी (०.८७%) वाढून १८,२१२ वर बंद झाला. सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी २४ समभाग वाढीसह बंद झाले, तर ६ समभाग घसरणीसह …

Read More »

“दलित-मागसांकडे दुर्लक्ष होतेय” युपीतील आणखी एका मंत्र्याचा राजीनामा २४ तासात दुसरे मंत्री पर्यावरण मंत्री दारासिंग चौहान यांनी दिला

मराठी ई-बातम्या टीम निवडणूकीच्या तारखेची घोषणा झाल्यापासून भाजपामधील आमदार आणि मंत्र्यांनी पक्षाचा राजीनामा देण्याचे सत्र काही थांबायला तयार नाही. काल कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्या यानी राजीनामा देवून २४ तास उलटत नाही तोच आज उत्तर प्रदेशचे पर्यावरण मंत्री दारासिंग चौहान यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यातील दलित-मागासवर्गीय समाजाच्या प्रगतीकडे …

Read More »

फडणवीस म्हणाले “पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी मागे रॅशन्लीस्ट” गोव्यात पत्रकार परिषदेत बोलताना केला दावा

मराठी ई-बातम्या टीम पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात त्यांच्या सुरक्षा प्रश्नाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेत याप्रकरणी एका समितीची स्थापनाही केली. त्या समितीचा अहवाल येण्यापूर्वीच पंतप्रधानांच्या त्या दोऱ्यात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवण्यात आली होती अशी माहिती तेथील अधिकारीच देत असल्याचा दावा भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. गोवा …

Read More »

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनाने घेतला हा निर्णय दोन शिफ्टमध्ये चालणार काम

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विधान भवनाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता विधान भवनाचे कामकाज दोन शिफ्टमध्ये सुरु राहणार आहे. यासंदर्भातील आदेशही विधानभवन प्रशासनाकडून जारी करण्यात आला आहे. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांचे सर्व प्रश्न विधानभवनाकडून …

Read More »

Video: महेश मांजरेकरांच्या नव्या चित्रपटात गिरणी कामगारांच्या चित्रणावरून संताप गिरणी कामगारांकडून तीव्र नाराजी

मराठी ई-बातम्या टीम मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे महेश मांजरेकर हे मागील काही महिन्यापासून सातत्याने वादाच्या मध्यवर्ती ठिकाणी रहात असून काही दिवसांपूर्वी त्यांनी गोडसे चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून एक नवा वाद निर्माण केला. आता त्यानंतर लालबाग परळमधील गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारीत “नाय वरणभात लोन्चा, कोण नाय …

Read More »

करदात्यांसाठी चांगली बातमी: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख वाढवली १५ मार्चपर्यंत आता आयटीआर दाखल करता येणार

मराठी ई-बातम्या टीम केंद्राने २०२०-२१ साठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत १५ मार्चपर्यंत वाढवली आहे. मात्र, ही मुदत केवळ कॉर्पोरेटसाठी वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ कॉर्पोरेट्स मार्चच्या मध्यापर्यंत आयकर रिटर्न भरू शकतात. टॅक्स ऑडिट रिपोर्ट्स आणि ट्रान्सफर प्राइसिंग ऑडिट रिपोर्ट्स दाखल करण्याची अंतिम मुदतही १५ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. …

Read More »

निलंबित १२ आमदारांच्या याचिकेवर न्यायालयात झालेला युक्तीवाद आणि निरिक्षणे निलंबन हकालपट्टीपेक्षा वाईट

मराठी ई-बातम्या टीम विधानभवनात तालिका अध्यक्षांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी विधानसभेने भाजपाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. या कारवाईच्या विरोधात भाजपाच्या त्या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना विनंती करण्याची सूचना निलंबित आमदारांना केली. त्यानुसार या आमदारांनी महाराष्ट्र विधानसभेला विनंती करणारे पत्रही लिहिले. मात्र त्यावर तात्काळ निर्णय …

Read More »

सलग २ ऱ्यादिवशी मुंबईसह उपनगरात बाधितांच्या संख्येत घट मात्र होम क्वारंटाईनमध्ये वाढ १८ हजार ९६७ बरे होवून घरी गेले, २२ जणांचा मृत्यू

मराठी ई-बातम्या टीम सलग दुसऱ्या दिवशी मुंबईसह उपनगरातील संख्येत घट आली आहे. मुंबईमध्ये ११ हजार ६४७ इतके बाधित आढळून आले आहेत. तर उपनगरातील ठाणे मनपा आणि जिल्हा, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल आदी भागात १० हजार रूग्ण मिळून एकूण मुंबई आणि उपनगरात २२ …

Read More »