Breaking News

फडणवीस म्हणाले “पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी मागे रॅशन्लीस्ट” गोव्यात पत्रकार परिषदेत बोलताना केला दावा

मराठी ई-बातम्या टीम

पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात त्यांच्या सुरक्षा प्रश्नाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेत याप्रकरणी एका समितीची स्थापनाही केली. त्या समितीचा अहवाल येण्यापूर्वीच पंतप्रधानांच्या त्या दोऱ्यात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवण्यात आली होती अशी माहिती तेथील अधिकारीच देत असल्याचा दावा भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

गोवा विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तेथे होत असलेली गळती रोखण्यासाठी ते येथे आले होते. या अनुशंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दौऱ्यासाठी पंजाबमध्ये गेल्यानंतर तेथील त्यांचे हेलिकॉप्टर हवामानामुळे उडणार नसल्याचे सिध्द झाल्यावर कसेही करून त्यांना रस्त्याने प्रवास करायला भाग पाडायचे आणि पुढे रस्त्यावर आल्यानंतर घातापात करण्याचा कट होता. यापूर्वीच खलिस्तानी वाद्यांनी जो कोणी पंतप्रधान मोदी यांच्यावर चप्पल फेकून मारेल त्याला बक्षिस देण्याचे जाहीर केले होते अशी आठवणही त्यांनी सांगितले.

तेथे निदर्शन करणारे हे काही शेतकरी नव्हते तर रॅशनिलीस्ट होते. त्यांनी घातापात केला नाही कारण त्यांना वरून आदेश आले नाहीत. त्यामुळे ते शांत बसले अन्यथा रॅशनिलीस्टचे अनेक नक्षलवादी तेथे होते आणि त्यांनी पुढील कट आखला होता. याची माहिती तेथील ज्या अधिकाऱ्याला होती. तोच अधिकारी ही सगळी माहिती देतोय असे सांगायलाही फडणवीस विसरले नाहीत. तसेच तेथील जागेची पाहणी केली असता असे लक्षात येते की त्यांच्यावर स्नायपर अॅटकही केला जाण्याची शक्यता होती.

तेथील प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही या गोष्टीची माहिती होती. तरीही पुढील कारवाई करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रस्त्याच्या प्रवासाला परवानगी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात समिती स्थापन केली आहे. या समितीने या सगळ्या माहितीचाही विचार करावा अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

शिवसेनेचे नेते आणि इतर पक्षाचे नेते गोव्यातही भाजपाचा पराभव होईल असे सांगत आहेत. मात्र गोव्यात भाजपाचेच सरकार सत्तेवर येणार असून शिवसेनेचे डिपॉझिट जप्त होईल असा दावाही त्यांनी केला.

महाराष्ट्रात ज्या पध्दतीने जनमताची चोरी करण्यात आली. त्या पध्दतीची चोरी आम्ही गोव्यात कधीही होवू देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

उद्योगपती आणि काँग्रेस खासदार नवीन जिंदाल यांचा भाजपात प्रवेश

उद्योगपती आणि काँग्रेसचे माजी खासदार नवीन जिंदाल यांनी रविवारी पक्षाचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *