Breaking News

सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी सेन्सेक्स ६१ हजारांच्या वर, ५३३ अंकांची नोंदवली वाढ

मराठी ई-बातम्या टीम

या आठवडय़ातील तिसऱ्या दिवशीही शेअर बाजारात तेजी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५३३ (०.८८%) अंकांनी वाढून ६१,१५० वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५६ अंकांनी (०.८७%) वाढून १८,२१२ वर बंद झाला. सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी २४ समभाग वाढीसह बंद झाले, तर ६ समभाग घसरणीसह बंद झाले.

आज महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरने सर्वाधिक ४.५९ टक्क्यांनी उसळी घेतली आहे. त्याच वेळी, टायटनच्या शेअरमध्ये १.५० टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. पेटीएमचा शेअर ३.३५ टक्क्यांनी घसरून १,०८२ वर आला आहे. बुधवारी मार्केट कॅप २७७.१० लाख कोटी रुपयांवर गेले आहे. मंगळवारी ते २७५.२७ लाख कोटी रुपये होते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग ३% च्या जवळ बंद झाले. सेन्सेक्स आज ४४८ अंकांनी वाढून ६१,०६४ वर उघडला. बुधवारी सेन्सेक्सने पहिल्या तासात ६१,२१८ चा उच्चांक आणि ६०,८५० चा नीचांक गाठला. महिंद्र अँड महिंद्रा, एअरटेल, एनटीपीसी, इंडसइंड बँक आणि सन फार्मा, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, पॉवरग्रीड, इन्फोसिस आणि आयसीआयसीआय बँक आदींचे शेअर्स वधारले. घसरलेल्या समभागांमध्ये नेस्ले आणि टीसीएसचा समावेश आहे.

सेन्सेक्समधील ५४१ समभाग अपर सर्किटमध्ये तर ३४३ लोअर सर्किटमध्ये राहिले. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५६ अंकांनी वाढून १८,२१२ वर बंद झाला. निफ्टी १८,१७० वर खुला होता. निफ्टीतील ५० समभागांपैकी ३५ नफ्यात राहिले, टीसीएस, सिप्ला, हिंदुस्थान युनिलिव्हर (एचयूएल), नेस्ले आणि डॉ. रेड्डी हे शेअर्स घसरले.

Check Also

विमा दाव्याच्या सेटलमेंटमध्ये एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर कंपन्यांचा रेशो ९० टक्क्यांपेक्षा जास्त

मराठी ई-बातम्या टीम आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जीवन विमा कंपन्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त क्लेम सेटलमेंट केले आहे. यामध्ये देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय विमा नियामक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *