Breaking News

Editor

अरूणाचल प्रदेशमध्ये निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाने १० जागा जिंकल्या

देशात सार्वत्रिक निवडणूकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्जही सर्वपक्षिय उमेदवारांनी भरले आहेत. देशात सार्वत्रिक निवडणूकीबरोबरच काही राज्यांच्या अर्थात अरूणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आदी राज्यातील विधानसभा निवडणूकाही पार पडत आहेत. यापार्श्वभूमीवर अरूणाचल विधानसभा निवडणूकीत भाजपाने ३० मार्च २०२४ रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून चार उमेदवार आज जाहिर

काही दिवसांपूर्वी शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाविकास आघाडीची पुण्यात जाहिर सभा पार पडली. त्या सभेत आणि इंदापूर येथील शेतकरी मेळाव्यात शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाविकास आघाडीची बारामतीतील उमेदवार या सुप्रिया सुळे असतील अशी …

Read More »

सुनिल तटकरे यांची माहिती, राष्ट्रवादीच्या कोट्यातून महादेव जानकर यांना परभणी…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणी लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला (रासप) देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला रासपचे नेते महादेव जानकर, क्रीडामंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे आदी उपस्थित होते. सुनिल तटकरे …

Read More »

आरएसएसचा अजेंडा हाणून पाडण्यासाठी भीमशक्तीचा काँग्रेस आघाडीला पाठिंबा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत असून भारताला हिंदू राष्ट्र बनवणे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना बदलणे हा त्यांचा अजेंडा आहे. भाजपाचा ४०० पारचा नारा हा दोन तृतियांश बहुमतासाठी असून एवढे बहुमत मिळाले की भाजपा राज्यघटना बदलणार हे भाजपाचे नेतेच जाहीरपणे सांगत आहेत. आरएसएस व भाजपाचा …

Read More »

स्वानंद किरकिरे म्हणाले, कविता आईच्या हातचं जेवण, तर गाणं शेफनं बनविलेलं…

कविता ही कविच्या हृदयातून कागदावर उतरते, त्याला जे सांगायचं ते तो कवितेच्या माध्यमातून सांगतो.  कविता आईच्या हातच्या जेवणासारखी असते तर, गाणं लिहीतांना ते लोकांसाठी लिहीलेलं असल्यानं त्याला सजवून लिहावं लागतं ते एखाद्या शेफनं बनवलेल्या कुझीन प्रमाणे असावं लागतं, मात्र त्यात आईच्या हातासारखी चव देखील असावी लागते, अशा सोप्या शब्दात लोकप्रिय …

Read More »

‘चैत्र चाहूल’चे २०२४ चे ध्यास सन्मान जाहिर!

‘चैत्र चाहूल’तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘ध्यास सन्मान’ या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. दीर्घकाळ सकस काम करणारा प्रयोगशील लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता म्हणून परिचित असलेले जेष्ठ रंगकर्मी अतुल पेठे तसेच गेली ४० वर्षाहून अधिक काळ संगीत क्षेत्रात वादक, गायक, संगीतकार, संगीत संयोजक म्हणून कार्यरत असलेले जेष्ठ लोक कलावंत मनोहर …

Read More »

सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधानचा ‘लग्न कल्लोळ’

लवकरच लग्नसराईची धुमशान संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होणार आहे. त्यापूर्वीच ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीने संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त गाण्यांसाह सर्वत्र धुमाकूळ घातलेल्या ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर करून आपल्या ओटीटी प्रेक्षकांना सरप्राईज गिफ्ट दिले आहे. महाराष्ट्रातील चित्रपट रसिक प्रेक्षक हा सुवर्णयोग मनस्वी अनुभवत आहेत. श्रुती आणि अथर्व एकमेकांवर प्रेम …

Read More »

देशाच्या कोअर सेक्टरमधील उत्पादनात घट उद्योग मंत्रालयाने नुकतीच जाहिर केली आकडेवारी

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने २७ मार्च रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील आठ प्रमुख पायाभूत सुविधा क्षेत्रांची वाढ फेब्रुवारी २०२४ मध्ये ६.७% पर्यंत कमी झाली. विशेष म्हणजे पायभूत सुविधा क्षेत्रातील कंपन्यांना देशाच्या कोअर सेक्टरचा भाग समजले जाते. कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खत, पोलाद, सिमेंट आणि वीज या …

Read More »

गौतम अदानी यांच्या प्रकल्पात मुकेश अंबानींची भागिदारी मध्य प्रदेशातील ऊर्जा प्रकल्पातील २६% भागभांडवल विकत घेतले

देशातील दोन प्रतिस्पर्धी अब्जाधीशांमधील पहिल्या सहकार्यात, मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने गौतम अदानी यांच्या मध्य प्रदेश ऊर्जा प्रकल्पातील २६ टक्के भागभांडवल उचलले आहे आणि प्लांट्सची ५०० मेगावॅट वीज कॅप्टिव्ह वापरासाठी वापरण्यासाठी करार केल्याची माहिती बिझनेस लाईन या इंग्रजी दैनिकाच्या संकेतस्थळावर देण्यात आली. रिलायन्स अदानी पॉवर लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या महान …

Read More »

देशातील तरूणाईच्या रोजगाराबाबत चिंताजनक स्थिती

भारतातील तरुणांच्या रोजगाराची सद्यस्थिती आणि दृष्टीकोन यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अलीकडील अहवालात देशाच्या व्यापकपणे बोलल्या जाणाऱ्या ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’चे एक भयानक चित्र मांडण्यात आले आहे, जे तात्काळ आणि लक्ष्यित धोरणात्मक हस्तक्षेप होत नाही तोपर्यंत वाया जाईल असे दिसते. यासंदर्भात नुकतेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने भारताविषयीचा एक अहवाल जारी केला आहे. यात भारत …

Read More »