Breaking News

Editor

सोने आयातमध्ये ७२ टक्के वाढ व्यापार तूटीतही वाढ

नवी दिल्लीः प्रतिनिधी डिसेंबरमध्ये देशाची सोन्याची आयात तब्बल ७२ टक्क्यांनी वाढून ३.३९ अब्ज डॉलरवर गेली आहे. मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या सोने आयातीमुळे या महिन्यात व्यापार तूटही वाढून ती १४.८८ अब्ज डॉलरवर पोचली आहे. डिसेंबर २०१६ मध्ये १०.५५ अब्ज डॉलरची ही तूट होती. त्यात आणखी ४ अब्जची वाढ झाली आहे. देशाची निर्यात डिसेंबर महिन्यात १२ टक्क्यांनी वाढून २७ अब्ज डॉलरवर गेली आहे. तर एकूण आयातीत २१.१ टक्के वाढ झाली आहे. या महिन्यात ४१.९ अब्ज डॉलरची आयात करण्यात आली. डिसेंबरमध्ये तेलाच्या आयातीचे बील ३५ टक्के वाढून १०.३५ अब्ज डॉलर झाले आहे. याअगोदरच्या महिन्यात ९.५५ अब्ज डॉलरचे तेल आयात करण्यात आले होते. दरम्यान, इंजिनिअरींग वस्तू आणि  ऑयल  प्रोडक्‍ट्सची  निर्यात  डिसेंबरमध्ये  २५  टक्के  वाढली  आहे. तर तयार कपड्यांची निर्यात मात्र ८ टक्क्याने घटून १.३३ अब्ज डॉलरची राहिली आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने  तेल  आयातीवरचा  खर्च  वाढल्याचे  सरकारने  म्हटले आहे. एप्रिल – डिसेंबर दरम्यान निर्यात वाढली एप्रिल – डिसेंबर २०१७ या कालावधीत निर्यात मागील वर्षीच्या तुलनेत २१.०५ टक्क्यांनी वाढली आहे. या कालावधीत देशाची निर्यात २२३.५१२ अब्ज डॉलरची झाली आहे. मागील वर्षीच्या याचकालावधीत १९९.४६७ अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या ९ महिन्यात आयात २१.७६ टक्के वाढून ३३८.३६९ अब्ज डॉलरवर पोचली आहे. Share on: WhatsApp

Read More »

९९ रुपयात करा विमान प्रवास एअर एशियाची प्रवाशांसाठी खास ऑफर

नवी दिल्लीः प्रतिनिधी विमान कंपनी एअर एशियाने प्रवाशांसाठी एक खुषखबर आणली आहे. कंपनीने खास ऑफर प्रवाशांना दिली असून एअर एशियाने प्रवास करू इच्छीणाऱ्या प्रवाशांसाठी आता फक्त ९९ रुपयांमध्ये देशातंर्गत विमान प्रवास करता येणार आहे. ही ऑफर १५ जानेवारी ते ३१ जुलै दरम्यान तिकीटे बुक करणाऱ्यांसाठी असल्याचे एअर एशियाच्या व्यवस्थापनाने सांगितले …

Read More »

मायमेडिसीन बॉक्सची राष्ट्रव्यापी व्हिटामिन-डी विरोधी जागरुकता मोहिम २९ राज्यांतील २ हजार ठिकाणी, १ दशलक्ष लोकांना सेवा प्रदान करणार

मुंबई: प्रतिनिधी मायमेडिसीनबॉक्स कंपनीच्यावतीने देशातील व्हिटामिन–डीच्या कमतरतेबाबत जनजागृती अभियान राबविणार असून देशात एकाचवेळी २ हजार ठिकाणी सेवा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी घरी औषधांचे वितरण आणि प्रयोगशाळा चाचण्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. देशात ६५–७०% लोकसंख्येत व्हिटामिन–डीची कमतरता असल्याने त्याबाबत जनजागृकता अभियान राबविण्यात येणार आहे. आजच्या जगात जेथे जीवन अतिशय वेगवान …

Read More »

निफ्टी प्रथमच १० हजार ७०० च्या वर विक्रमी पातळी ओलांडली

मुंबईः प्रतिनिधी नवीन वर्षात देशातील शेअऱ बाजार रोज नवीन विक्रम बनवत आहे. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतामुळे सोमवारी शेअर बाजार पूर्ण दिवस उच्चांकी पातळीवर व्यवहार करत असल्याचे दिसून आले. दिवसाच्या अखेरीसही विक्रमी पातळीवर बाजार बंद होत निफ्टीने प्रथमच १० हजार ७०० च्या वर बंद झाला. तर सेन्सेक्सही २५१ अंकांनी वाढून ३४ …

Read More »

कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांच्या उच्चांकावर प्रती बॅरल ७० डॉलरवर, आयात करणाऱ्या देशांची चिंता वाढली

नई दिल्लीः प्रतिनिधी डिसेंबर २०१४ नंतर कच्च्या तेलाचे दर (क्रुड ऑईल) प्रथमच प्रती बॅरल ७० डॉलरच्या पुढे गेले आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या भावामुळे आयात करणाऱ्या देशांची चिंता वाढली आहे. याचा परिणाम देशातही पेट्रोल, डिझेलचे भाव वाढण्यात होण्याची शक्यता आहे. मागील सहा महिन्यात कच्च्या तेलाच्या दरात तब्बल ५७ टक्के वाढ झाली …

Read More »

जीवलगांकडे पाहण्याची नवी दृष्टी देणार ‘कृतांत’ चित्रीकरण पूर्ण; पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू

मुंबईः प्रतिनिधी विषयांमधील वेगळेपण हे मराठी चित्रपटसृष्टीचं वैशिष्ट्य मानला जातं. इथे दैनंदिन जगण्यातील विषयांवर चित्रपट बनवले जात असून याच धाटणीचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. ‘कृतांत’ असं शीर्षक असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे. ‘रेनरोज फिल्म्स’च्या बॅनरखाली मिहीर शाह यांनी ‘कृतांत’ची निर्मिती केली आहे. मुहूर्त …

Read More »

संविधान बचाव आंदोलनात सहभागी होणार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी देशाची राज्यघटना बदलण्याचा भाजपचा मनसुबा असल्याची जाहीर कबुली केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी दिल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या पुढाकाराने सर्वपक्षिय संविधान बचाव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा २६ जानेवारी २०१८ रोजी मुंबईत होणार असून या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती …

Read More »

राज्यातील फायद्याच्या संस्थांनी सरकारच्या खात्यात पैसे ठेवावे नव्याने कर्ज घेण्यासाठी एमएमआरडीए, म्हाडासह १० संस्थांना सरकारचे आदेश

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विकास कामांना गती देण्यासाठी निधी अपुरा पडत असल्याने नव्याने कर्ज काढण्याची गरज पडू शकते. त्यासाठी राज्याच्या तिजोरीत ५० हजार कोटींची गंगाजळी दाखविणे आवश्यक आहे. एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, सिडको, एमआयडीसी सारख्या संस्थांना राज्य सरकारच्या खात्यात पैसे जमा करण्याविषयी कळविण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मागील आठवड्यात …

Read More »

न्यायमुर्ती लोया यांच्या मृत्यूबाबत आता शंका नाही पुत्र अनुज लोयाच्या खुलासाने लोया मृत्यूप्रकरणास वेगळे वळण

मुंबई : प्रतिनिधी गुजरातमधील सोहाराबुद्दीन चकमकप्रकरणी सुणावनी घेत असलेले सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया अर्थात माझे वडील यांच्या मृत्यूबाबत सुरुवातीला संशय होता. मात्र त्यांच्या मृत्यूबाबत आता माझ्यासह आमच्या कुटुंबियांच्या मनात कोणताही संशय नसल्याचा खुलासा न्यायाधीश स्व. लोया यांचा मुलगा अनुज लोया याने आज केला. नरिमन पाँईट येथील मित्तल टॉवरमध्ये …

Read More »

नोकऱ्या देणारे बना… राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी दिला युवकांना कानमंत्र

मुंबई : प्रतिनिधी नोकरीतल्या संधी भलेही सोडेल पण मी स्वत: रोजगार निर्माता बनेल, स्वत:चा व्यवसाय सुरु करेन अशी भावना स्वत:मध्ये निर्माण करून नोकऱ्या देणारे बना असा कानमंत्र युवकांना देत संस्था, उद्योग परिवार, खासगी बँका, स्वयंसेवी संस्था, माध्यमे यांनी खासगी व्यवसायाला सन्मान मिळेल अशी संस्कृती आणि वातावरण निर्माण करण्यास हातभार लावला पाहिजे असे मत राष्ट्रपती …

Read More »