Breaking News

Editor

४८ तास उलटून गेल्यानंतर आता मराठी अनुवादप्रकरणी चौकशीची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला आश्वासन देवूनही अंमलबजावणी नाहीच

मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी झालेल्या राज्यपाल सी. विद्यासागर यांच्या अभिभाषणाचा अनुवाद मराठीत वाचून न दाखविल्याने सभागृहाचा हक्कभंग झाला. याप्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत सभागृहाची माफी मागत संध्याकाळपर्यंत संबधित व्यक्तीला घरी पाठविण्याची घोषणा केली. त्यास ४८ तास उलटून गेले तरी संबधित अधिकारी-कर्मचारी अद्याप घरी तर …

Read More »

लसीकरण निविदेत चालढकल करणाऱ्या मंत्र्याची चौकशी कोण करणार? विरोधक आक्रमक तर पदुम राज्यमंत्री खोतकर यांची त्रेधातिरपीट

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांची जनावरे असलेल्या बैल, गाय, म्हशींना लाळ-खुरकत रोगाची लागण होवून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. मागील वर्षभरापासून जनावरांना लस देण्यासाठी निविदेचा सातवेळा घोळ घालण्यात येत असल्याने घोळ घालणाऱ्या संबधित पदुम आयुक्त आणि मंत्र्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी करत राज्य सरकारला चांगलेच धारेवर …

Read More »

बोंडअळीच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक विधानसभेचे कामकाज तीनवेळा तहकूब

मुंबई : प्रतिनिधी विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीट अवकाळी पावसामुळे आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र शेतकऱ्यांचे गारपीटीमुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव होवून नुकसान झाल्याचा मुद्दा सत्ताधारी भाजपचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी उपस्थित करत संपूर्ण विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या विरोधकांनी बोंडअळीचा प्रश्न वेगळा असताना तो गारपीट …

Read More »

निवडणूकीपूर्वीच ‘मोहन जोशी पॅनल’ने मारली बाजी! राज्यभरातील २८ बिनविरोध विजयी उमेदवारांचा पाठिंबा

मुंबई : प्रतिनिधी मी आजवर नाट्य परिषदेची सेवाच केली असून ‘मोहन जोशी पॅनल’मधील सर्व उमेदवार हाच वसा जोपासत कार्य करणार असल्याची ग्वाही देत मोहन जोशी यांनी राज्यभरातील २८ बिनविरोध विजयी उमेदवारांचा पाठिंबा असल्याचे जाहिर करीत विरोधकांची हवाच काढून टाकली आहे. ‘मोहन जोशी पॅनल’च्या उमेदवार आणि त्यांच्या कार्याची माहिती देण्यासाठी आयोजित …

Read More »

चांदनी गर्लची जुदाई दुपारी अंत्यसंस्कार होणार

मुंबई : प्रतिनिधी कालपासून श्रीदेवींच्या मृत्यूबाबतचे गूढ नेमके काय? हा प्रश्न अनेकांना सतावत होता. शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलेल्या मृत्यूच्या कारणामुळे श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत आणण्यास जवळजवळ दोन दिवस विलंब झाला असला तरी आता सर्व अडचणी दूर झाला असल्याचं समजतं. अर्जुन कपूर स्वत: श्रीदेवी यांचे पार्थिव आणण्यासाठी दुबईत पोहोचला आहे. …

Read More »

टी सीरीज तर्फे प्रकाशीत व्हिडीओबद्दल काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना १० प्रश्न स्पष्टीकरण देण्याची काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी टी सीरीज तर्फे युट्युब व अन्य समाजमाध्यमांवर प्रकाशीत करण्यात आलेल्या व्यवसायिक व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांना नाचताना, गाताना दाखवण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १० प्रश्न विचारत या प्रश्नांचे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी …

Read More »

मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी सरकार भूमिका घेईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठी विद्यापीठाच्या जागेचा ताबा सुपुर्द

मुंबई : प्रतिनिधी मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी म्हणून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सर्वच साहित्यप्रेमींकडून आणि साहित्यिकांकडून बोलले जात आहे. याबाबत सरकारने भूमिका घेण्‍याची गरज आहे. ती भूमिका सरकार नक्की घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवनात दिली. यावेळी मुंबईत सुरू होणा-या मराठी भाषेच्या पहिल्या विद्यापीठाच्या जागेचा करार मुख्यमंत्री …

Read More »

शेतकऱ्यांनाही आरक्षण द्या राज्य व केंद्राकडे मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील एससी, एसटी, ओबीसी मध्ये असलेल्या शेतकऱ्याला तर आरक्षण मिळणारच आहे. पण जो याच्या बाहेरचा शेतकरी आहे. त्यालाही सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक या तीन निकषावर तपासून जो मागास शेतकरी आहे. त्यालाही आरक्षण द्यावे असे माझे मत असून या वर्गाला सवलती द्याव्यात अशी मागणी आपण राज्य व केंद्र …

Read More »

मराठी भाषा दिनीच मराठी शाळा बंद करण्याचे शिक्षण विभागाचे फर्मान दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करण्याची विखे-पाटील यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी नेमका मराठी भाषा दिनाचाच ‘मुहूर्त’ साधून जालना जिल्ह्यातील एक मराठी शाळा बंद करण्याबाबतचे सरकारी फर्मान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सभागृहात सादर करून मराठीबाबत सरकारचा कळवळा बेगडी असल्याचा ठपका ठेवला. विधीमंडळातील मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमातील सावळ्या गोंधळावर विरोधी पक्षांनी आज सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. या दरम्यान, …

Read More »

अखेर श्रीदेवींच्या पार्थिवाचा मार्ग मोकळा रात्री उशीरापर्यंत पार्थिव येण्याची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी २४ फेब्रुवारीला रात्री निधन झालेल्या श्रीदेवी यांचे पार्थिव तीन दिवस झाले तरी अद्याप भारतात आलेले नाही. सुरुवातीला हृदयविकारच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले, पण काल दिवसभर ज्या घटना घडल्या त्यामुळे श्रीदेवींचे पार्थिव मुंबईत आणण्यास विलंब झाला. शवविच्छेदन अहवालामध्ये श्रीदेवी यांचा मृत्यू हृदयविकाराने नव्हे, तर अपघाती झाल्याचे …

Read More »