Breaking News

चांदनी गर्लची जुदाई दुपारी अंत्यसंस्कार होणार

मुंबई : प्रतिनिधी

कालपासून श्रीदेवींच्या मृत्यूबाबतचे गूढ नेमके काय? हा प्रश्न अनेकांना सतावत होता. शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलेल्या मृत्यूच्या कारणामुळे श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत आणण्यास जवळजवळ दोन दिवस विलंब झाला असला तरी आता सर्व अडचणी दूर झाला असल्याचं समजतं. अर्जुन कपूर स्वत: श्रीदेवी यांचे पार्थिव आणण्यासाठी दुबईत पोहोचला आहे. कागदोपत्री कारवाई पूर्ण झाली असून श्रीदेवी यांचे पार्थिव दुबईहून रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उद्या दुपारनंतर श्रीदेवी अनंतात विलीन होणार असल्याचे कपूर कुटुंबियांच्या वतीने देण्यात आलेल्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

खुशी, जान्हवी, बोनी कपूर, संपूर्ण कपूर परीवार आणि अय्यपन कुटुंबियांनी दु:खाच्या क्षणी योग्य साथ दिल्याबद्दल प्रसारमाध्यमांचे आभार मानले आहेत. यासोबतच त्यांनी श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेबाबतची माहितीही मीडियाला दिली आहे. या माहितीनुसार उद्या सकाळी ९:३० ते दुपारी १२:३० पर्यंत श्रीदेवी यांचे पार्थिव अंधेरीतील लोखंडवाला कॅाम्प्लेक्समधील सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. या प्रसंगी प्रसारमध्यमांच्या प्रतिनिधींना कॅमेरा तसेच रेकॅार्डींग डिवायसेस बाहेर ठेवून श्रीदेवींचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आत प्रवेश दिला जाईल. त्यानंतर दुपारी २ वाजता सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब ते पवन हंसपर्यंत श्रीदेवी यांची अंत्ययात्रा काढण्यात येईल. पवन हंसजवळील विले पार्ले सेवा समाज स्मशानभूमीमध्ये दुपारी ३:३० नंतर अंत्यसंस्काराचा विधी प्रारंभ करण्यात येईल. यावेळी प्रसारमाध्यमांना बाहेरील मुख्य प्रवेशद्वारापर्यंतच प्रवेश देण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *