Breaking News

सोने आयातमध्ये ७२ टक्के वाढ व्यापार तूटीतही वाढ

नवी दिल्लीः प्रतिनिधी

डिसेंबरमध्ये देशाची सोन्याची आयात तब्बल ७२ टक्क्यांनी वाढून ३.३९ अब्ज डॉलरवर गेली आहेमोठ्या प्रमाणावर वाढलेल्या सोने आयातीमुळे या महिन्यात व्यापार तूटही वाढून ती १४.८८ अब्ज डॉलरवर पोचली आहेडिसेंबर २०१६ मध्ये १०.५५ अब्ज डॉलरची ही तूट होती. त्यात आणखी ४ अब्जची वाढ झाली आहे.

देशाची निर्यात डिसेंबर महिन्यात १२ टक्क्यांनी वाढून २७ अब्ज डॉलरवर गेली आहेतर एकूण आयातीत २१.१ टक्के वाढ झाली आहेया महिन्यात ४१.९ अब्ज डॉलरची आयात करण्यात आलीडिसेंबरमध्ये तेलाच्या आयातीचे बील ३५ टक्के वाढून १०.३५ अब्ज डॉलर झाले आहे. याअगोदरच्या महिन्यात ९.५५ अब्ज डॉलरचे तेल आयात करण्यात आले होतेदरम्यानइंजिनिअरींग वस्तू आणि  ऑयल  प्रोडक्ट्सची  निर्यात  डिसेंबरमध्ये  २५  टक्के  वाढली  आहेतर तयार कपड्यांची निर्यात मात्र  टक्क्याने घटून १.३३ अब्ज डॉलरची राहिली आहेकच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने  तेल  आयातीवरचा  खर्च  वाढल्याचे  सरकारने  म्हटले आहे.

एप्रिल – डिसेंबर दरम्यान निर्यात वाढली

एप्रिल – डिसेंबर २०१७ या कालावधीत निर्यात मागील वर्षीच्या तुलनेत २१.०५ टक्क्यांनी वाढली आहेया कालावधीत देशाची निर्यात २२३.५१२ अब्ज डॉलरची झाली आहेमागील वर्षीच्या याचकालावधीत १९९.४६७ अब्ज डॉलरची निर्यात झाली होतीदरम्यानचालू आर्थिक वर्षाच्या  महिन्यात आयात २१.७६ टक्के वाढून ३३८.३६९ अब्ज डॉलरवर पोचली आहे.

Check Also

वॉरबर्ग पिंकसने विकत घेतली श्रीराम हाऊसिंग कंपनी ४ हजार ६३० कोटी रूपयांना झाला व्यवहार

न्यूयॉर्क स्थित प्रायव्हेट इक्विटी फर्म वॉरबर्ग पिंकस श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (SHFL) ला इक्विटी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *