Breaking News

निफ्टी प्रथमच १० हजार ७०० च्या वर विक्रमी पातळी ओलांडली

मुंबईः प्रतिनिधी

नवीन वर्षात देशातील शेअऱ बाजार रोज नवीन विक्रम बनवत हे. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतामुळे सोमवारी शेअर बाजार पूर्ण दिवस उच्चांकी पातळीवर व्यवहार करत असल्याचे दिसून ले. दिवसाच्या अखेरीसही विक्रमी पातळीवर बाजार बंद होत निफ्टीने प्रथमच १० हजार ७०० च्या वर बंद झाला. तर सेन्सेक्सही २५१ अंकांनी वाढून ३४ हजार ८४३ या विक्रमी पातळीवर स्थिरावला. सोमवारी निफ्टीने ६० अंकांची वाढ नोंदवली.

सोमवारी शियाई बाजारही उच्चांकावर पोहोचले. त्यामुळे भारतीय बाजारातही तेजी ली. एसबी, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, यटीसी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या चांगल्या वाढीने बाजाराला सर्पोर्ट मिळाला. बँकांच्या शेअर्समधील तेजीने निफ्टी बँक इंडेक्स प्रथमच २६ हजारांच्या वर गेला.

मागील विक्रमी पातळी

१२ जानेवारीला सेन्सेक्सने ३४ हजार ६३८.४२ ची नवीन पातळी गाठली.

तर निफ्टीने १० हजार ६९०.२५ वर गेला.

११ जानेवारीला निफ्टीने १० हजार ६६४.६० च्या उच्चाकांवर पोहोचला

जानेवारीला सेन्सेक्सने ३४ हजार ५६५.६३ अंकाच्या नवीन पातळीवर पोहोचला

जानेवारीला सेन्सेक्सने ३४ हजार ४८७.५२ च्या तर निफ्टीने १० हजार ६३१.२० च्या उच्चांकावर मजल मारली

जानेवारीला सेन्सेक्सने ३४ हजार १७५ आणि निफ्टीने १० हजार ५६६.१० या पातळीवर होता.

Check Also

गुगल स्मार्ट फोनसाठी तामीळनाडूत प्रकल्प उभारणार फॉक्सनंतर आता गुगलकडूनही फोन निर्मितीसाठी तामीळनाडूची निवड

गुगल Google ने स्मार्टफोन निर्मिती सुविधा स्थापन करण्यासाठी तामिळनाडूमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *