Breaking News

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची माहिती, दोन पोलिस अधिकारी निलंबित सुरेंदर अग्रवाल यालाही अटक, ड्रायव्हरला पोलिस संरक्षण देणार

मुंबईतील मतदानाच्या आदल्या दिवशी पुणे शहरातील कल्याणीनगर येथे दारू पिऊन पोर्शे कार भरधाव वेगात चालवित दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एका बिल्डरच्या मुलास वाचविण्यासाठी मदत केलेल्या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी मदत केल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार दोन पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित कऱण्यात आल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार पुढे म्हणाले की, अपघात झाल्यानंतर अगरवाल यांच्या ड्रायव्हरला सुरेंदर अगरवाल यांनी दोन दिवस घरातच कोंडून ठेवले. तसेच त्याला धमकी देऊन तर आमिष देऊन गाडी चालवताना तो मुलगा नव्हता तर हा ड्रायव्हर होता असा जबाब द्यायला भाग पाडल्याची माहिती तपासा दरम्यान पुढे आली. तसेच त्या दबावामुळे ड्रायव्हरने सुरुवातीला तसा जबाब दिल्याचे सांगितले. त्यामुळे आता प्रसंगी ड्रायव्हरलाही आम्ही संरक्षण देऊ असे आश्वासनही यावेळी दिले.

पुढे बोलताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, सुरेंदर अगरवाल यांच्या घराची झडती घेण्यात आली आहे. यापूर्वी अपघातातीतल अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन त्याच्या घराची झडती घेण्यात आली. त्यात घरातील सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये हस्तक्षेप करण्यात आल्याचे दिसून आले असल्याचेही यावेळी सांगितले.

शेवटी पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, नातवाला वाचविण्यासाठी ड्रायव्हरवर दबाव आणल्याप्रकरणी सुरेंदर अगरवाल यालाही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अगरवाल कुटंबातील तीन पिढ्यांना पोर्शे कार अपघात प्रकरणी अटक करण्यात आल्याचे ही सांगितले.

दरम्यान, ज्या मुलाचा रॅप गाण्याचा व्हिडिओ प्रसारीत झाला होता, तो व्हिडिओ सदर अपघातातील मुलाचा नसल्याची माहिती देत ज्या मुलाने हा व्हिडिओ प्रसारीत केला, त्याच्यावर सायबर गुन्ह्यातंर्गत कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिस आयुुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

Check Also

बॉम्बच्या धमकीमुळे विस्ताराच्या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लॅडिंग एकर सिकनेस बॅगवर हस्तलिखित नोट

३०६ प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह मुंबईला जाणाऱ्या विस्तारा फ्लाइटला विमानात “बॉम्बची धमकी देणारी एअर सिकनेस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *