Breaking News
83 percent water storage in seven lakes of Mumbai

मान्सूनला उशीर?, मुंबईकरांनो पाणी कपात, पाणी जपून वापरा शरद पवार यांच्या इशाऱ्यानंतर मुंबईत पाणी कपात लागू

राज्यातील उन्हाळा मौसम चांगलाच उष्ण राहिल्याने नागरिकांप्रमाणेच शेतकऱी, जनावरांनाही पाण्याचा प्रश्न भेडसावण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच मागील वर्षीच्या मौसमात पाऊस कमी प्रमाणात पडल्याने २०२४ साल उजाडताच जानेवारी महिन्यातच राज्यात पाण्याचा टँकरने पाणी पुरवठ्यास सुरुवात झाली. त्यातच यापूर्वी हवामान खात्याने वेळेआधी मान्सून सक्रिय होणार असल्याचे संकेत दिले. मात्र अद्याप तरी मान्सून सक्रिय झाला नाही. त्यामुळे मान्सून लांबणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असतानाच त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुंबईसह राज्यातील पाणी प्रश्नी राज्य सरकारचे लक्ष वेधले. त्याची अखेर मुंबई महानगरपालिकेने दखल घेत पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई महापालिकेने आज पाणी कपातीसंदर्भातील निर्णय जाहिर करताना ३० मे पासून मुंबईत ५ टक्के पाणी कपात लागू केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे ३१ मे रोजी पासून जर मान्सून सक्रिय झाला तर पुढील पाणी कपात रद्द करावी लागणार आहे. तसेच मान्सून सक्रिय होण्यास जर उशीर झाला तर ५ जून पासून मुंबईत पाणी कपात ही १० टक्के राहणार आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ तलावातील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. तसेच आजस्थितीला या ७ ही तलावातील पाणी साठा १५ टक्क्याच्या खाली सरकला आहे. तसेच वातावरणातील उष्मा काही केल्या कमी व्हायला अद्याप तयार नाही. त्यामुळे रोजच्या पाणी वापराबरोबरच पाण्याचे वाफेत रुपांतर होण्याचे प्रमाणही जास्त आहे.

शरद पवार यांनी नुकत्याच घेतलेल्या काल शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, वाढत्या उन्हाळ्यामुळे आणि अपुऱ्या पावसामुळे पाणी साठ्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. मान्सून सक्रिय झाला म्हणून तलाव, धरणे ही काही लगेच भरत नाहीत. त्यास वेळ लागतो. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे लागणार आहे. मान्सून जर लांबला तर साधारणतः १३ जुलै पर्यंत पाण्याचे नियोजन करावी लागणार असल्याची शक्यताही व्यक्त केली होती.

शरद पवार यांच्या या इशाऱ्यानंतर मुंबई महापालिकेने मुंबईकरांच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी आज लगेच तातडीने पाणी कपातीचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.

https://x.com/mybmc/status/1794302389400322187

Check Also

बॉम्बच्या धमकीमुळे विस्ताराच्या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लॅडिंग एकर सिकनेस बॅगवर हस्तलिखित नोट

३०६ प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह मुंबईला जाणाऱ्या विस्तारा फ्लाइटला विमानात “बॉम्बची धमकी देणारी एअर सिकनेस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *