Breaking News

मायमेडिसीन बॉक्सची राष्ट्रव्यापी व्हिटामिन-डी विरोधी जागरुकता मोहिम २९ राज्यांतील २ हजार ठिकाणी, १ दशलक्ष लोकांना सेवा प्रदान करणार

मुंबई: प्रतिनिधी

मायमेडिसीनबॉक्स कंपनीच्यावतीने देशातील व्हिटामिनडीच्या कमतरतेबाबत जनजागृती अभियान राबविणार असून देशात एकाचवेळी २ हजार ठिकाणी सेवा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी घरी औषधांचे वितरण आणि प्रयोगशाळा चाचण्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. देशात ६५७०% लोकसंख्येत व्हिटामिनडीची कमतरता असल्याने त्याबाबत जनजागृकता अभियान राबविण्यात येणार आहे.

आजच्या जगात जेथे जीवन अतिशय वेगवान झाले आहे, विशेषतः शहरी भागात, जेथे लोक आपले घर ते कार आणि कार ते वातानुकूलित कार्यालय असा प्रवास करीत आहेत, ते क्वचितच अवशोषित नैसर्गिक सुर्यप्रकाशात बाहेर पडतात. त्यामुळे या मोहिमेमागील मुख्य उद्दीष्ट म्हणजे नैसर्गिकरित्या व्हिटामिनडी मिळवण्यासाठी जागरुकता पसरवणे हा असल्याचे मायमेडिकल बॉक्सचे मनमोहन गुप्ता यांनी सांगितले.

अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, कंपनीने सध्या ३५ प्रतिनिधी नियुक्त केले आहेत आणि पुढील ३ महिन्यांत १०० अधिक तज्ज्ञांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. घरे व कार्यालयांमधून रक्ताचे नमुने गोळा करण्यासाठी आणि व्हिटामिनडी ची कमतरता जाणण्याची हायपो व्हिटामिनॉसिसडी ची चाचणी घेण्यासाठी कंपनी प्रगत निदान आणि पॅथॉलॉजी लॅब थायरोकेअर सह सुसज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारतात दरवर्षी १० लाखांपेक्षा अधिक हायपो व्हिटामिनॉसिसडी च प्रकरणे आढळतात, ज्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. बहुतेक लोक कोणतीही लक्षणे दर्शवत नाहीत. कारण त्यांना परिणामांची जाणीव नसते. ही मोहिम म्हणजे या सामान्यपणे आढळणार्‍या परंतु गंभीर आरोग्य समस्या निर्माण करणार्‍या कमतरतेवर प्रकाश टाकण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. घर किंवा कार्यालय अशा सोयीच्या ठिकाणी व स्वस्त दरात, भारतीय नागरिकांचे निदान आणि त्यांच्यावर उपचार करण्याचे कार्य आम्ही हाती घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

व्हिटामिनडी च्या कमतरतेमुळे ऑस्टियोपोरोसिस, हृदयरोग, मधुमेह, स्वयंप्रतिकार रोग, उच्च रक्तदाब, केस गळणे, ५० वर्षांनंतर वारंवार हाड मोडणे, तीव्र वेदना, संधिवात आणि कमी गर्भधारणा परिणाम अशा प्रकारचे आरोग्यास हानीकारक असलेले परिणाम संभवतात. गंभीर प्रकरणांमध्ये, कमतरतेमुळे पातळ, ठिसूळ किंवा बेढब हाडे होऊ शकतात. त्याच्या सर्वात जास्त स्वरुपात, बालपणात दीर्घकालीन आणि तीव्र व्हिटामिन डी च्या करतरतेमुळे मुडदूस होऊ शकतो, वाढ उशीरा होते. यामुळे व्हिजिबल स्केलेटल डीफॉर्मिटीज होऊ शकतो अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मायमेडिसीनबॉक्स सध्या www.mymedicinebox.in या वेबसाईटवर आणि मोबाईल ऍपवर २०% – ४०% दरम्यान सूट देत आहे. हे आयओएस आणि ऍंड्रॉइडवर उपलब्ध आहेत. यामुळे आता मुंबईतील ५०,००० हून अधिक कुटुंब जोडली गेली आहेत.

Check Also

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, ‘स्मार्ट पीएचसी’ चा सातारा पॅटर्न राज्यभर राबविणार

राज्यातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य …