Breaking News

न्यायमुर्ती लोया यांच्या मृत्यूबाबत आता शंका नाही पुत्र अनुज लोयाच्या खुलासाने लोया मृत्यूप्रकरणास वेगळे वळण

मुंबई : प्रतिनिधी

गुजरातमधील सोहाराबुद्दीन चकमकप्रकरणी सुणावनी घेत असलेले सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया अर्थात माझे वडील यांच्या मृत्यूबाबत सुरुवातीला संशय होता. मात्र त्यांच्या मृत्यूबाबत आता माझ्यासह आमच्या कुटुंबियांच्या मनात कोणताही संशय नसल्याचा खुलासा न्यायाधीश स्व. लोया यांचा मुलगा अनुज लोया याने आज केला.

नरिमन पाँईट येथील मित्तल टॉवरमध्ये आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. न्या.लोया यांच्या मृत्यूबाबत अनेक राजकिय पक्षांबरोबरच सामाजिक संघटनांनी चौकशी करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयातील कारभाराबाबत ज्या चार विद्यमान न्यायमूर्तींनी आवाज उठविला त्यांनीही याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केल्याने याबाबत गुढ वाढले होते. मात्र अनुज लोया याच्या खुलाशामुळे यास आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

यावेळी बोलताना अनुज लोया म्हणाले की, गेले काही दिवस न्या.लोयांच्या मृत्यूवरून ज्या घटना घडत होत्या. त्या घटनांमुळे मला वैयक्तिक आणि कुटुंबियांना त्रास झाला. तसेच काही राजकिय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांकडून सातत्याने दबाव टाकला जात असल्याचा आरोपही केला.

वडीलांच्या मृत्यूबाबत सुरुवातीला मला आणि माझ्या कुटुंबातील नातेवाईकांना शंका येत होत होती. त्याबाबत आमच्या शंका आम्ही व्यक्तही केल्या. मात्र आता वडीलांच्या मृत्यूबाबत कोणत्याही शंका नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केला.

यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणत्याही प्रश्नास उत्तर देण्याचे टाळत पत्रकार परिषद आटोपती घेतली.

न्या.लोया यांच्या मृत्यूबाबत शंका घेणारे वृत्त प्रकाशित होवून जवळपास चार महिन्याहून अधिक कालावधी लोटल्यानंतर अनुज लोया यांनी त्याबाबतचा खुलासा केला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातील गुढ आणखी वाढले असून यास वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *