Breaking News

मुख्यमंत्र्यांवर या उपचाराला सुरुवात: पण प्रकृती उत्तम उद्धव ठाकरे यांच्यावर फिजिओथेरपी सुरू

मुंबई: प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मानेवरील स्पाईन सर्जरी यशस्वी झाली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत आहे. मात्र त्यांच्यावर आता फिजिओथेरपीचे उपचार सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा रूग्णालयातील मुक्काम वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी एसएन रिलायन्स रूग्णालयात स्पाईन सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पुढील दोन-तीन दिवसात डिस्जार्च मिळेल आणि ते पुन्हा मुख्यमंत्री म्हणून आपले काम सुरु करतील असा अदांज शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. परंतु जवळपास १० दिवसानंतर त्यांच्यावर आता फिजोओथेरपीचे उपचार सुरु झाल्यामुळे आणखी साधारणत: आठवडाभर हे उपचार सुरु राहतील. त्यानंतर त्यांना घरी डिस्जार्च मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यांना जरी घरी डिस्जार्च दिला तरी त्यांना त्यानंतर साधारणत: २ ते ३ आठवडे बेड रेस्टच करावे लागणार आहे. त्यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्विकारण्यास विलंब होणार आहे. त्यांचा मुक्काम रूग्णालयातील वाढणार असल्याने राज्याचे विधिमंडळाचे अधिवेशनही लांबणार असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील स्पाईन सर्जरी यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे. सध्या एच एन रिलायन्स रुग्णालयात त्यांची फिजिओथेरपी सुरू आहे. त्यांना योग्यवेळी डिस्चार्ज देण्यात येईल असे रुग्णालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून आज देण्यात आली.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *