Breaking News

बाजारात विदेशी गुंतवणूकदारांकडून नोव्हेंबरमध्ये १९,७१२ कोटींची गुंतवणूक शेअर बाजारात १३ टक्क्यांनी वाढविली गुंतवणूक

मुंबई: प्रतिनिधी

विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत भारतीय बाजारात १९,७१२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरी डेटानुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी १ ते १८ नोव्हेंबर दरम्यान इक्विटी मार्केटमध्ये १४,०५१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या दरम्यान त्यांनी कर्ज रोख्यांमध्ये ५,६६१ कोटी रुपये ठेवले. अशाप्रकारे या कालावधीत त्यांची एकूण १९,७१२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.

मॉर्निंगस्टारने दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. देशांतर्गत शेअर्समध्ये परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा हिस्सा मागील तिमाहीच्या तुलनेत सप्टेंबर २०२१ मध्ये संपलेल्या तिमाहीत १३ टक्के वाढून ६६७ अब्ज डॉलर झाला आहे. देशांतर्गत शेअर बाजारांच्या मजबूत कामगिरीमुळे या तिमाहीत शेअर्समधील एफपीआयचा हिस्सा वाढला आहे. सप्टेंबर २०२१ ला संपलेल्या तिमाहीच्या शेवटी भारतीय समभागांमध्ये FPI गुंतवणुकीचे मूल्य ६६७ अब्ज डॉलर झाले आहे, जे मागील तिमाहीतील ५९२ अब्ज डॉलरपेक्षा १३ टक्क्यांनी वाढले आहे. सप्टेंबर २०२० मध्ये भारतीय शेअर बाजारात FPI गुंतवणुकीचे मूल्य ३९८ अब्ज डॉलर होते. मात्र, भारतीय शेअर बाजाराच्या भांडवलीकरण किंवा मूल्यांकनामध्ये FPIs चे योगदान किरकोळ घटून १९ टक्क्यांवर आले, जे मागील तिमाहीत १९.१ टक्के होते.

नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात FPIs ने भारतीय बाजारातून ९४९ कोटी रुपये काढले आहेत. महत्त्वाचे म्हणजे विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय बाजारातून ९४९ कोटी रुपये काढले होते. डिपॉझिटरी डेटानुसार, १-१२ नोव्हेंबर दरम्यान एफपीआयने इक्विटीमधून ४,६९४ कोटी रुपये काढले. त्याच वेळी त्यांनी कर्ज किंवा रोखे बाजारात ३,७४५ कोटी रुपये ठेवले. अशा प्रकारे त्यांची निव्वळ काढलेली रक्कम ९४९ कोटी रुपये झाली. ऑक्टोबरमध्ये FPIs ची निव्वळ विक्री १२,४३७ कोटी रुपये होती.

दरम्यान,विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) ऑक्टोबरमध्ये भारतीय बाजारातून १२,२७८ कोटी रुपये काढले. याआधी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये FPIs हे भारतीय बाजारात निव्वळ खरेदीदार होते.

डिपॉझिटरी डेटानुसार, FPI ने १ ते २९ ऑक्टोबर दरम्यान इक्विटीमधून १३,५५० कोटी रुपये काढले आहेत. यादरम्यान त्यांनी डेट किंवा बाँड मार्केटमध्ये १,२७२ कोटी रुपये ठेवले आहेत. अशा प्रकारे त्यांची एकूण १२,२७८ कोटी रुपये काढले आहेत. या कालावधीत इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि थायलंड यांना अनुक्रमे ९५.१ कोटी डॉलर, ८ कोटी डॉलर आणि ५६.४ कोटी डॉलर परकीय गुंतवणूक मिळाली. दुसरीकडे, तैवान आणि दक्षिण कोरियामधील FPIs ने अनुक्रमे २६३.३ कोटी डॉलर आणि २८०.१ कोटी डॉलर काढले आहेत.

Check Also

इन्वेस्कोने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भरला दंड सेबीने ठोठावला होता दंड

इन्वेस्को ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, तिचे सीईओ सौरभ नानावटी आणि इतर चार जणांनी म्युच्युअल फंड आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *