Breaking News

महसूल राज्यमंत्री सत्तार यांचेही निवडणूक प्रतिज्ञापत्र वादाच्या भोवऱ्यात प्रत्येक निवडणूकीच्या प्रतिज्ञापत्रात वेगवेगळी माहिती

पुणे-मुंबई: प्रतिनिधी

राज्याचे माजी महसूल मंत्री तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक प्रतिज्ञा पत्रात माहिती लपविल्याने प्रकरणी पुणे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी चौकशी दिल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता सध्याचे विद्यमान महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या शैक्षणिक माहितीचे प्रकरण पुढे आले आहे. त्यामुळे त्यांचे नेमके शिक्षण किती असा सवाल डॉ.अभिषेक हरिदास यांनी केला.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी २००४ साली सिल्लोड येथील विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात १९८२ साली एसएससी अर्थात १० वी, १९८४ साली एचएससी अर्थात १२ वी झाल्याचे नमूद केले. त्यानंतर २००९ साली पुन्हा विधानसभेसाठी अर्ज भरताना १० वी आणि १२ वीचा उल्लेख करत उच्च शैक्षणिक अर्हता बी.ए.असा उल्लेख केला. त्यानंतर २०१४ साली उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी बी.ए.अपियर असल्याचा उल्लेख केला. तर २०१९ साली शैक्षणिक या कॉलममध्ये बी.ए.एफ.वाय असल्याचा उल्लेख केला. त्यामुळे मंत्री अब्दुल सत्तार यांचे नेमके शिक्षण झाले किती असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच यासंदर्भात आपण न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यासंदर्भात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड येथील आणि मंत्रालयातील कार्यालयांशी आणि त्यांच्या मोबाईलवर सातत्याने संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *