Breaking News

महालक्ष्मी रेसकोर्स मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क

मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या १२० एकर जागेत मुंबई महापालिकेकडून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क विकसित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. महालक्ष्मी रेसकोर्सच्या २११ एकर जागेपैकी १२० एकर भूखंडावर न्यूयॉर्क (अमेरिका), लंडन (युके) येथील पार्कच्य धर्तीवर हा पार्क विकसित केला जाणार आहे.

हा भुखंड शासनाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात येणार असून त्यावर जनतेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे विकसित करण्यात येईल.

महालक्ष्मी रेसकोर्स येथील मे .रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंडावरील कराराची १ जून, २०१३ ते सदर भूभागाचा प्रत्यक्षात ताबा घेण्याच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीसाठीच्या भाडेपट्ट्याचे नुतनीकरण करण्यात मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे सदर कालावधीसाठी द्यावे लागणाऱ्या रकमेच्या फरकाची रक्कम महसूल व वन विभागाने निश्चित करुन दिलेल्या दरानुसार मुंबई महानगरपालिकेद्वारे वसुल करण्यात येईल.

तसेच, महालक्ष्मी रेसकोर्स येथील एकूण २११ एकर भूखंडापैकी मे.रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. यांना ९१ एकर भूखंड प्रत्यक्षात ताबा देण्याच्या दिनांकापासून ते पुढील ३० वर्षाच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्याच्या अनुषंगाने सदर भाडेपट्ट्याचे नुतनीकरण हे वेळोवेळी विहित करण्यात आलेल्या तरतूदीनुसार करण्यास मान्यता देण्यात आली.

महसूल विभागाच्या २३ जून २०१७ च्या शासन निर्णयानुसार मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील अनुसूची “डब्ल्यू” मधील महालक्ष्मी रेसकोर्स, विविध जिमखाने व तत्सम भूभाग या मालमत्तांना अनुषंगीक तरतूदी लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Check Also

भारतीय राज्यघटना बदलली तर राष्ट्र कोलमडेल

देशातील अठरापगड जातधर्माचे १४० कोटी लोक राज्यघटनेमुळे एकत्र नांदत असून देश एकसंघ आहे. भारतीय राज्यघटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *