Breaking News

Tag Archives: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

आता अहमदनगर आणि मुंबईतील या रेल्वे स्थानकांच्या नामकरणाला मान्यता

आगामी लोकसभा निवडणूक राज्यातील सत्ताधारी तिन्ही पक्षांचे खासदार पराभवाच्या छायेत आल्याने मराठी भाषा आणि मराठी नावे पुन्हा एकदा चर्चेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुप्रतिक्षित अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी असे करण्याबरोबर मुंबईतील इंग्रज अधिकाऱ्यांच्या नावे असलेली रेल्वे स्थानकांची नावे आता मराठी नावे देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य …

Read More »

महालक्ष्मी रेसकोर्स मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क

मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या १२० एकर जागेत मुंबई महापालिकेकडून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क विकसित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. महालक्ष्मी रेसकोर्सच्या २११ एकर जागेपैकी १२० एकर भूखंडावर न्यूयॉर्क (अमेरिका), लंडन (युके) येथील पार्कच्य धर्तीवर हा पार्क विकसित केला जाणार आहे. हा …

Read More »

वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला राज्य शासनाची मान्यता

राज्य मंत्रिमंडळाने आज (११ मार्च), पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-१ मधील वनाज ते रामवाडी या मार्गिकेची विस्तारीत मार्गिका वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) या प्रकल्पांना मान्यता दिली. पुण्याच्या वाहतूक विकासात या प्रकल्पाचे महत्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पांना …

Read More »

नवनगर विकास प्राधिकरणाद्वारे संपादित जमिनीच्या मोबदल्यात ६.२५ टक्के परतावा

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने आपल्या स्थापनेपासून (१४ मार्च १९७३ ते ३१ डिसेंबर १९८३ या कालावधीत) ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी प्राधिकरणाकरिता संपादित केल्या होत्या, अशा संपादित जमिनींकरीता संबंधित जमीन मालकांना ६.२५ टक्के प्रमाणे जमीन परतावा करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या (११ मार्च) बैठकीत मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड प्राधिकारण …

Read More »

सत्यशोधक मराठी चित्रपट अखेर चार महिन्यासाठी करमुक्त

सत्यशोधक मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शिक्षण आणि सामाजिक प्रेरणादायी विचारांना चालना देणारा हा चित्रपट मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पहावा यासाठी विशेष खेळाचे आयोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

राज्यातील नागरी भागात आता बाल विकास केंद्र

कुपोषणावर मात करण्यासाठी राज्यातील नागरी भागात ग्रामीण बाल विकास केंद्र योजनेच्या धर्तीवर नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र योजना सुरू करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात ग्रामीण भागामधील अतितीव्र कुपोषित (SAM)बालकांच्या कुपोषणावर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने अंगणवाडीस्तरावर ग्राम …

Read More »

निवडणूका डोळ्यासमोर ठेवत सरकारचा मोठा निर्णयः जुनी निवृत्तीवेतन योजना लागू

आगामी लोकसभा निवडणूकीला आता काही महिने शिल्लक राहिलेले असताना आणि राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणूका लागण्याची शक्यता लक्षात घेत पुन्हा मतदारांना आकर्षित करण्यासाठी जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातींनुसार शासन सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर …

Read More »

शेती महामंडळाच्या जमिनीबाबत आणि मुद्रांक शुल्काबाबत मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बैठक

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जसजशी जवळजवळ येत चालली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटाच्या आमदार अपात्रतेची सुनावणीची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंतिम तारीख जसजशी जवळ जवळ येत आहे. तसतशी राज्य मंत्रिमंडळाकडून महत्वाच्या विषयावर निर्णय घेत लोकोपयोगी निर्णय घेण्यात येत असल्याचा सपाटाच विद्यमान राज्य मंत्रिमंडळाकडून …

Read More »

आता जलविद्युत प्रकल्पातही खाजगी भागिदारीचे धोरणः राज्य सरकारचा निर्णय मोठी खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येण्याचा राज्य सरकारचा दावा

सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी (Pumped Storage Projects) स्वतंत्र धोरण राबवून मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूकीला जलविद्युतमध्ये प्रोत्साहन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात १० हजार ७५७ मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा उत्पादन झाले आहे. २०२५ पर्यंत ही ऊर्जा क्षमता २५ हजार मेगावॅटपर्यंत …

Read More »

राज्य सरकारचा निर्धार; मुलींना करणार लखपती राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर …

Read More »