Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीला यंग अचिव्हर्स पुरस्कार

मुंबईसह राज्यात दोन लाख कोटींचे रस्ते, रेल्वे अशा पायाभूत सुविधांची विकास कामे सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘सोसायटी अचिवर्स पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमात केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना यंग अचिव्हर्स पुरस्कार प्रधान करण्यात आला.

सांताक्रूझ येथील ताज हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ गायिका मीनाताई खडीकर, अभिनेत्री हेमामालिनी, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, अभिनेता अनुपम खेर, सोनू सूद, सिद्धार्थ मल्होत्रा आदी मान्यवरांसह सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अमृता फडणवीस यांना सोसायटी अचिव्हर्स अवॉर्ड देवून गौरविण्यात आले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याचे काम सोसायटी मासिक गेली अनेक दशके करीत आहे. या पुरस्कारांच्या माध्यमातून लाखो वाचकांना प्रेरणा देण्याचा सोसायटी मासिकाचा उपक्रम अभिनंदनीय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. २ लाख कोटींचे रस्ते, रेल्वे अशा पायाभूत सुविधांची विकासकामे सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी गेल्या चार महिन्यात केलेल्या विकासकामांची माहिती दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्ही मुंबई आणि राज्याचे परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. आपण सर्व मिळून मुंबई आणि महाराष्ट्राला अधिक सर्वोत्तम बनवूया. विविध क्षेत्रात राज्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या मान्यवरांचा आज गौरव झाला आहे. सोसायटी मासिकाने सर्वोत्कृष्ट प्रशासनाचा पुरस्कार सुरू केल्यास तो घ्यायला आम्ही नक्की येवू, असेही ते म्हणाले.

यावेळी मॅग्ना प्रकाशन समूहाचे अध्यक्ष नारी हिरा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *