Breaking News

एकनाथ शिंदे बंडाळी; ठाकरे सरकारने घेतला यु टर्न मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले माझा संपर्क सुरु आहे

राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेतील दोन नंबरचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंडाळी केली. या बंडाळीचा आज दुसरा दिवस असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार आणि विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णयावर जवळपास एकमत झाले. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार होता. मात्र ऐनवेळी हा विषय दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच मांडत माझे प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट केल्याने  ठाकरे सरकारने यु टर्न घेतल्याचे दिसून येत आहे.

रात्री उशीरापर्यत एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले बंडाळी केलेले आमदार सूरतहून आसामची राजधानी गुहावटी येथे पोहोचले. तेथे पोहोचल्यानंतर मुंबईतून संजय राठोड, गुलाबराव पाटील आणि राजेंद्र यड्रावकर हे तीन आमदारही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवित त्यांच्या गटात सहभागी झाले. त्यामुळे राजकिय पार्श्वभूमीवर सुरु झालेले वादळ एकदम खाली आले.

याच पार्श्वभूमीवर काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गेलेल्या आमदार आणि मंत्र्यांना परत आणण्यास असमर्थता दर्शविली. याशिवाय नव्याने खासदार, आणि आमदारांना एकत्रितरित्या मुंबईत ठेवता येवू शकणार नसल्याचे त्या बैठकीत स्पष्ट केले.

या साऱ्या पार्श्वभूमीवर काल रात्री आणि आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सरकार हातातून गेल्याची भावना निर्माण झाली. तसेच हे सरकार पुर्णपणे गेल्यानंतर पुढील हालचाली करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाविकास आघाडीच्यावतीने राज्य सरकार आणि विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस करायची असा निर्णयही घेण्यात आला. मात्र काँग्रेसकडून सरकार बरखास्त करण्य़ाऐवजी त्याचा बचाव करण्यासाठी जोपर्यंत वेळ आहे. तोपर्यंत प्रयत्न करण्यास काय हरकत आहे अशी भूमिका घेत तशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबरोबरील चर्चेत घेण्यात आली.

तर दुसऱ्याबाजूला शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे सांगितले. त्यामुळे आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकार अल्पमतात आल्याचे सिध्द झाल्यानंतर मानहानीकारक पध्दतीने बाहेर पडण्याऐवजी सन्मान बाहेर पडण्याबाबत निर्णय घेवू असा निश्चय करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु झाल्यानंतर सध्याच्या विद्यमान घडामोडींच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बोलताना सांगितले की, शिवसेनेचे गेलेले मंत्री आणि आमदारांना परत आणण्याच्या अनुशंगाने माझे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्याशी संपर्क करण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले.

त्यामुळे विधानसभा आणि राज्य सरकार बरखास्तीचा विषय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला नाही की त्यावर चर्चाही झाली नाही. त्यामुळे काल रात्री पर्यंत मुख्यंमंत्री हताश असल्याचे चित्र होते. मात्र आज एकदम मुख्यमंत्री सक्रिय झाल्याचे दिसून आल्याची चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित मंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे ठाकरे सरकारनेच सरकार बरखास्तीपासून यु टर्न घेतल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जे होईल ते बघु असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *