Breaking News

मुख्यमंत्री साहेब, मंत्रालयाच्या गेटवर सँनिटायझर टनेल बसवाल का ? मंत्रालयातील कर्मचारी-अधिकाऱ्यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी
कोरोना लॉकडाऊन असतानाही राज्याच्या प्रशासनाचे कामकाज आणि थांबलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी उद्यापासून मंत्रालयातील कामकाजात अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढविण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई महानगरातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मंत्रालयाच्या मुख्यप्रवेशद्वारावर सँनिटायझरच्या टनेलची व्यवस्था करावी अशी मागणी शासकिय अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
वाढत्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार अनेक कर्मचारी-अधिकाऱ्यांनी घरी बसून लढ्यात सहभाग नोंदविला. मात्र आता राज्यातील जनतेसाठी प्रशासनाचा गाडा पुढे नेण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार सर्व कर्मचारी-अधिकारी कामावर हजर होण्यासाठी घरातून मंत्रालयात येणार आहेत. याकाळात या सर्वांचा प्रवास मुंबई महानगरातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या भागातून तर त्याच्या जवळून होणार आहे. त्यामुळे कळत नकळकत हे विषाणू प्रवास करणाऱ्यांच्या कपड्यावर, शरीरावर बसण्याची शक्यता असल्याने मंत्रालयात टनेलमधून प्रवेश केल्याने सदरच्या विषाणूंचा खात्मा तेथेच होईल अशी आशा या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सँनिटाझरचा टनेल मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसवावा अशी विनंती करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *