Breaking News

रात्रो ८ वाजेपर्यत दुकाने चालू ठेवा मात्र तांदूळ वाटा आतापर्यत ४६०३८७ रेशनकार्डधारकांना मोफत तांदळाचे वाटप

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात कोरोना लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला प्रति महिन्याचे धान्य वाटून प्रति माणसी ५ किलो तांदूळाचे मोफत वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारने जारी करण्यात आले आहे. तसेच हे मोफत धान्य वाटप करण्यासाठी सकाळी ८ ते रात्रो ८ वाजेपर्यत धान्य वाटण्याचे आदेश सर्व रेशनिंग अर्थात रास्तभाव धान्य दुकानदारांना बजाविण्यात आले आहेत.
हे तांदूळ राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील कुटुंबीयांना, अंत्योदय अन्न योजनेतील सर्व लाभार्थी कुटुंबियांना वाटप करण्याचे आदेश त्यांनी बजावले आहेत. आतापर्यत १२ एप्रिल ते १५ एप्रिल या कालावधीत ४६०३८७ रेशनकार्डधारकांना या धान्याचे वाटप करून मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. तर १६ एप्रिल २०२० रोजी सकाळी ८ पासून संध्याकाळी ५ वाजेपर्यत १०७२११ अशा ५६७५९८ इतक्या रेशन कार्ड धारकांनी तांदळाची उचल केली आहे. सद्यपरिस्थितीत ६९८२८ क्विंटल तांदळाचा साठा असून आतापर्यत ३४ टक्के रेशनकार्ड धारकांनी तांदळाची उचल केली आहे.
मोफत तांदूळ हे जून २०२० पर्यत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्यासाठी दुकानदारांनी सकाळी ८ रात्रो ८ वाजपर्यत दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे रेशनकार्ड धाराकांनी दुकानासमोर गर्दी करू नये असे आवाहन करत योग्य अंतर ठेवण्याची सूचना केली आहे.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *