Breaking News

पंचतारांकित हॉटेलमध्ये काँग्रेसची शिवसेनेबरोबर सदिच्छा भेट उध्दव ठाकरेंच्या भेटीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात, चव्हाण, ठाकरे आदी नेते

मुंबईः प्रतिनिधी
शिकाँरा महाआघाडीच्यावतीने राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विशेषतः मंगळवारी काँग्रेस नेते अहमद पटेल आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाल्यानंतर आज बुधवारी शिवसेनेशी पुढील चर्चा करण्यासाठी नरिमन पाँईट येथील हॉटेल ट्रायडंट येथे जावून काँग्रेस नेत्यांनी उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली.
तब्बल दोन तासाहून अधिक काळ या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे आदी उपस्थित होते.
या बैठकीत सत्ता स्थापनेसाठी प्रामुख्याने काँग्रेस आणि शिवसेनेचा कोणता सामायिक कार्यक्रम असू शकेल यावर चर्चा झाली. तसेच मंत्रिमंडळातील संभाव्य खाते वाटपाच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आल्याची माहिती काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
बैठक संपल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, काल दोन्ही नेत्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर चित्र स्पष्ट आहे. त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन पक्षात सामायिक कार्यक्रम ठरविण्याचे काम सुरु झाले आहे. तो ठरला की पुन्हा शिवसेनेशी चर्चा होवू शकते.
तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, चर्चा सुरु आहे. लवकरच सामायिक कार्यक्रम ठरविण्यात येईल. त्याची माहिती योग्य वेळी जाहिर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *