Breaking News

Tag Archives: shivsena

उमेदवारी माघारी घेतल्यानंतर मुरजी पटेल म्हणाले, मी दबावामुळे अर्ज मागे…

अंधेरी पोटनिवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात ही लढत होणार होती. भाजपा आणि शिंदे गटाकडून मोठ्या थाटा-माटात मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहिर करत त्यांचा उमेदवारीही भरला. परंतु त्यास दोनच दिवसाचा अवधी लोटत नाही तोच भाजपाने या निवडणुकीतून …

Read More »

भाजपाच्या उमेदवारी माघारीवरून अजित पवार म्हणाले, वातावरण लक्षात घेता… ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा

मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर अखेर भाजपाने अंधेरी पूर्वमधील पोटनिवडणुकीमधून माघार घेतली. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उमेदवारी दिली. विशेष म्हणजे भाजपाने माघारीचा निर्णय घेण्याआधीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उध्दव ठाकरे यांची कॅसेट …

Read More »

उध्दव ठाकरेंची कॅसेट जुनी झाली म्हणणाऱ्या बावनकुळेंवर उमेदवार माघारीची नामुष्की

कै. रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा जागेकरीता पोट निवडणूक जाहीर झाली. निवडणूक जाहिर झाल्यानंतर शिंदे गट-भाजपाच्यावतीने उमेदवारही जाहिर करत त्या उमेदवारी अर्जही भरला. विशेष म्हणजे नागपूरात बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उध्दव ठाकरे यांची कॅसेट जुनी झाल्याची टीका करत त्यांना संताजी-धनाजी सारखे शिंदे आणि फडणवीस …

Read More »

उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरेंचा नामोल्लेख टाळत फक्त शरद पवारांचे मानले आभार महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा शरद पवारांनी दाखविला, शिवसेना कुटुंबाकडून आभार

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणूक जाहिर झाली. या रिक्त जागेकरीता उध्दव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना दिली. तर भाजपा-शिंदे गटाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. परंतु ही निवडणूक बिनविरोध व्हावी या उद्देशाने सर्वप्रथन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपा नेते …

Read More »

राज ठाकरे यांच्या पत्रानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीत उध्दव ठाकरे यांच्या गटाने ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहिर करत त्यांचा उमेदवारी अर्जही भरला. त्यापाठोपाठ शिंदे गट-भाजपाच्यावतीने मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर या दोघांकडूनही प्रचाराचे रणशिंग फुंकत प्रचाराला सुरुवात केली. यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा जाहिर …

Read More »

अंधेरी पोटनिवडणूक: ठाकरे गटाला राज ठाकरे यांचा पाठिंबा, केले भाजपाला आवाहन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उमेदवार मागे घ्या

अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली. त्यानंतर काल शनिवारी दुपारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दोन भेटीमुळे राज्याच्या राजकारणात या भेटी कशासाठी आणि का? अशी चर्चा सुरु झाली. त्यातच आज रविवारी सकाळी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या …

Read More »

मोगलांना संताजी धनाजी दिसायचे तसे उद्धव ठाकरेंना सर्वत्र शिंदे–फडणवीस दिसतात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

मोगलांच्या सैनिकांनी धसका घेतल्याने त्यांना जसे सर्वत्र संताजी-धनाजी दिसायचे तसे उद्धव ठाकरे यांना सर्वत्र शिंदे – फडणवीस दिसतात असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना लगावला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी संताजी धनाजींसारखा शिंदे फडणवीसांचा धसका घेतला आहे. त्यांना ते सर्वत्र दिसतात. …

Read More »

‘हा’ माजी मंत्री हाती बांधणार शिवबंधन, उध्दव ठाकरेंची विदर्भात सभा

शिवसेनेतील फुटीसंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयात अद्याप निकाल प्रलंबित असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगानेही शिवसेना कोणाची याबाबत अद्याप अंतिम निर्णय दिलेला नाही. त्यातच अंधेरी पोट निवडणूकीच्या निमित्ताने शिवसेनेला अनेक पक्षांकडून पाठिंबा देण्यात येत आहे. तसेच आगामी महापालिका निवडणूका आणि त्यापाठोपाठ विधानसभा, लोकसभेच्या निवडणूका कधीही लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिंदे …

Read More »

उध्दव ठाकरे गटाच्या आरोपामुळे भाजपा उमेदवार मुरजी पटेल अडचणीत भाजपा काय उत्तर देणार याकडे लक्ष

राज्यातील उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार भाजपाच्या पाठिंब्याने शिवसेनेचेच मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने उलथून टाकले. त्यानंतर अंधेरी विधानसभा पोट निवडणूकीच्या निमित्ताने उध्दव ठाकरे विरूध्द शिंदे गट-भाजपा दरम्यान पहिली लिटमस टेस्ट होत आहे. या निवडणूकीसाठी ठाकरे यांच्या शिवसेनेच्यावतीने ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला तर भाजपा-शिंदे गटाच्यावतीने मुरजी पटेल यांनी …

Read More »

उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे काँग्रेस – राष्ट्रवादीला मत

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली व त्यांचे विचारही स्वीकारले. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मत देणे म्हणजे काँग्रेसला व राष्ट्रवादी काँग्रेसला मत असेल. भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते घरोघर जाऊन याबद्दल जागृती करतील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी सांगितले. ते मुंबई …

Read More »