Breaking News

उध्दव ठाकरेंची कॅसेट जुनी झाली म्हणणाऱ्या बावनकुळेंवर उमेदवार माघारीची नामुष्की

कै. रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा जागेकरीता पोट निवडणूक जाहीर झाली. निवडणूक जाहिर झाल्यानंतर शिंदे गट-भाजपाच्यावतीने उमेदवारही जाहिर करत त्या उमेदवारी अर्जही भरला. विशेष म्हणजे नागपूरात बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उध्दव ठाकरे यांची कॅसेट जुनी झाल्याची टीका करत त्यांना संताजी-धनाजी सारखे शिंदे आणि फडणवीस दिसत असल्याचा खोचक टोलाही लगवाला. त्यास २४ तास उलटत नाही तोच अंधेरीतील भाजपाचा उमेदवार माघार घेत असल्याचे जाहिर करण्याची नामुष्की आली.

विशेष म्हणजे दुपारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरात टीका केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित अंधेरी निवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी केल्याचा मुद्दा पुढे. त्यानंतर शरद पवार यांनीही यासंदर्भात सर्व पक्षांना आवाहन केले.

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टी – बाळासाहेबांची शिवसेना – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युतीचे उमेदवार मुरजी पटेल निवडणूक अर्ज मागे घेतील. कै. आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या निवडणुकीत विजयी होण्यासाठी भाजपाने हा महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार निर्णय घेतला.

ते म्हणाले की, अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाची तयारी पूर्ण झालेली आहे. अपेक्षित मते मिळवून भाजपा ही निवडणूक जिंकण्याच्या स्थितीत आहे. तथापि, एखाद्या आमदाराचे निधन झाले आणि त्यांच्या परिवारातील कोणी निवडणूक लढवत असेल तर निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्रात संस्कृती आहे. भाजपाने यापूर्वी अनेकदा असा निर्णय घेतला आहे. तसेच नव्याने निवडून येणाऱ्या आमदाराला जेमतेम एक दीड वर्ष कालावधी मिळणार आहे. त्यामुळे आज पक्षाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.

हा निर्णय केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाने घेतला आहे. राज्यासाठी संवेदनशील निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचे आपण आभार मानतो असेही त्यांनी यावेळी जाहिर केले.

Check Also

निर्मला सीतारामन यांची सॅम पित्रोदांच्या वर्णद्वेषी टिप्पणीवरून टीका

आंतरराष्ट्रीय ख्यातकिर्त विचारवंत शास्त्रज्ञ आणि काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी आज एक व्हिडिओ जारी करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *