राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत नागरिकांच्या मदत व बचाव कार्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनामार्फत सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण होत असलेल्या परिस्थितीवर राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून लक्ष ठेवण्यात येत असून यासाठी जिल्हा प्रशासनास आवश्यक मदत व साधनसामग्री उपलब्ध करून दिली जात असल्याने नागरिकांनी …
Read More »मराठवाड्यातील अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याशी फोनवरून साधला संवाद
मराठवाड्यातील काही जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी फोनवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या नागरिकांना तातडीने मदत करून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मराठवाड्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत द्या शेतकरी अस्मानी संकटात असताना महाराष्ट्राचे सुलतान मात्र गप्प
राज्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला असून शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. राज्यभरातील जवळपास सर्वच भागातीलं पिकं वाया गेली आहेत, हा खरीप हंगामच वाया गेला आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्याकडे पाहण्यास महायुती सरकारला वेळ नाही. शेतकरी एवढ्या प्रचंड संकटात महाराष्ट्राचे सुलतान देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री मदत देण्याबाबत तोंडातून चकार …
Read More »महाराष्ट्रात मान्सून अतिवृष्टीमुळे २९ जिल्ह्यांत शेती पिकांचे नुकसान राज्यातील १४,४४,७४९ हेक्टर क्षेत्र बाधित; कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय झाल्याने महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसताना दिसतोय.अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, …
Read More »दत्तात्रय भरणे यांची माहिती, अतिवृष्टीमुळे राज्यातील सुमारे २३.१४ लाख एकर शेती बाधित मंत्रिमंडळ बैठकीत नुकसान भरपाई संदर्भात निर्णय होण्याची शक्यता
अतिवृष्टीमुळे राज्यात शेतीचे मोठ्या नुकसान झाले असून प्राथमिक अंदाजानुसार आतापर्यंत २३ लाख १४ हजार ०५७.५ एकर खरीप पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. यासंदर्भात उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नुकसान भरपाईवर राज्य सरकार बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी काही तरी ठोस निर्णय घेणार असल्याचे समजते. राज्याचे कृषीमंत्री …
Read More »कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, राज्यात अतिवृष्टीमुळे ८ लाख हेक्टर पीकांचे नुकसान सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, तातडीने मदत करणार
राज्यात ९ ऑगस्टपासून आजपर्यंत १९ जिल्ह्यातील १८७ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या काळात ८ लाखांपेक्षा जास्त हेक्टर पीकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून, जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून पीडित शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, राज्यात… ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्या
राज्यात मागील तीन चार दिवसात मुसळधार पावसाने अनेक भागात पुरस्थिती उद्भवली आहे. या पावसाचे पाणी शेतात शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, उभी पिके वाहून गेली आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास १५ लाख एकर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतपिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे समजते. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करा …
Read More »राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबईसह पाच जिल्ह्यात रेड अलर्ट कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती
राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यासह कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, …
Read More »मकरंद जाधव-पाटील यांचे आदेश, अतिवृष्टी, पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा पुढील काही दिवस आणखी पावसाचा इशारा
राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे राज्यात शेत पीक, फळ बागांचे नुकसान झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल विनाविलंब सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले …
Read More »१८-१९ ऑगस्टला कोणत्या भागात कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या कोकण, मुंबई महानगर प्रदेश, आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पाऊस
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात धरण साठ्यात वाढ, नदी-नाल्यांना पूर, आणि दरड कोसळण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे आणि याच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), मुंबई महानगर प्रदेश, आणि मराठवाड्यात (प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण …
Read More »
Marathi e-Batmya