भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्राकडून मिळणाऱ्या पावसाच्या अनुमानानुसार राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत धरण विसर्ग, नद्यांची पाणी पातळी आणि पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीतील वाढ लक्षात घेऊन सोलापूर, परभणी, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यात मदत व बचाव कार्यासाठी आवश्यक पथके तैनात करण्यात आली …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, ओला दुष्काळाची मागणी, पण तशी तरतूदच नाही गेल्या महिन्यात ६० लाख हेक्टरचे नुकसान, शेतकऱ्यांना केवायसीची अट शिथिल
गेल्या महिन्यात सातत्याने अतिवृष्टी झाली त्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याचा आढावा घेतला. सुमारे ६० लाख हेक्टर नुकसान झाल्याचा अंदाज असून पहिल्या टप्प्यात ऑगस्ट पर्यंत २ हजार २१५ कोटी रुपये वितरित करण्यास सुरुवात केली आहे. पण सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी करण्यात येत आहे. पण …
Read More »मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, कृषी विभागातील कर्मचारी देणार एक दिवसाचे वेतन शेतकऱ्यांच्या संकटात शासकीय यंत्रणा केवळ प्रशासनापुरती मर्यादित नाही
अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संकटाच्या काळात हातभार म्हणून कृषी विभागाचे राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच त्यांनी स्वतःचे एक महिन्याचे वेतन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता …
Read More »बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ २० ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार
राज्यातील अतिवृष्टीचे संकट आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने घेतला आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना दूरध्वनी करून मुदतवाढ देण्याबाबत निर्देश दिले होते. फेब्रुवारी -मार्च महिन्यात होऊ घातलेल्या बारावीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना परीक्षा अर्ज …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, विधानसभेचे विशेष अधिवेशन घ्या राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात यावी
राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली. याबाबत विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र लिहीत मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांसह राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर आपत्कालीन परिस्थितीकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. राज्यातील नैसर्गिक …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा यांची टीका, हाहाकार माजला असला तरी केंद्राला अहवालही पाठवला नाही अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, दसरा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्ष हा सुवर्णयोग एकाच दिवशी आलेला आहे. रा. स्व. संघाला १०० वर्षे होत असताना आलेला हा योग संघाने समजून घ्यायला हवा. गांधी पुतळ्याच्या समोर फक्त मानवंदना देऊन चालणारा नाही तर नथुरामचा धिक्कार करून बुरसटलेले विचार, मनुस्मृती व बंच ऑफ थॉट …
Read More »जयंत पाटील यांचे राज्यपालांना पत्र, तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा… राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांची राज्यपालांना पत्र लिहित केली विनंती
राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीवर चर्चा व्हावी म्हणून तीन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा असे विनंती करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना लिहिले आहे. जयंत पाटील राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात म्हणाले की, यावर्षी राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. मागील आठवड्याभरापासून …
Read More »सोलापूरमध्ये अतिवृष्टीचे थैमान, भर पावसात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा पाहणी दौरा ऑगस्ट मधील नुकसानाची मदत मंजूर, सप्टेंबर महिन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई लवकरच देण्यात येईल
सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक स्वरूपात १० लाख २० हजार ९१७ एकर क्षेत्राचं नुकसान झालं आहे. तर, राज्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार ३७ लाख ९१ हजार ३२१ हेक्टर म्हणजे ९४ लाख ७८ हजार ३०२ एकर क्षेत्र बाधित आहे. ऑगस्ट महिन्यातील पंचनामे पूर्ण होऊन ५९.७९ कोटींचा मदत निधी जाहीर करण्यात आला आहे. …
Read More »उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र, भाजपाला सरकार चालवता येत नाही हा डोळस विश्वास पूरग्रस्तांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये द्यावे, पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना ५० हजार कोटी रूपये द्यावेत
राज्यातील भाजपाला प्रशासन कळत नाही, त्यांना सरकार चालविता येत नाही. जे काही राज्यात सुरु आहे ते दिल्लीच्या बळावर सुरु आहे. त्यामुळे माझा अंध नव्ह तर डोळस विश्वास असल्याची टीका शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या गंगेमध्ये डुबकी मारल्यानंतर सर्व पापे धुतली जातात, …
Read More »महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे एकूण ३१ लाख ६५ हजार शेतकरी बाधित २ हजार २१५ कोटींचा निधी मंजूर
१७ ते २६ सप्टेंबर या कालावधीतील भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात अतिवृष्टी झाली. या कालावधीत जवळपास ३१ लाख ६५ हजार शेतकरी बाधित झाले. नेमक्या याच कालावधीत अतिवृष्टीबरोबरच मराठवाड्यातील बहुतांष भागात पूरस्थिती निर्माण झाली. तसेच सोलापूरातही पुर परिस्थिती निर्माण झाली. या ३१ लाख ६५ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम जवळपास …
Read More »
Marathi e-Batmya