Tag Archives: attack on tourist

बिहारमधून पंतप्रधान मोदी यांचा इशारा, दहशतवाद्यांना कल्पनेपलीकडे शिक्षा मधुबनी येथील जाहिर सभेत बोलताना पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना दिला इशारा

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा बळी गेला. त्यानंतर बिहार मधील मधुबनी येथे आयोजित एका जाहिर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना, या हल्ल्यामागील दहशतवादी आणि कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा मिळेल असा इशारा दिला. पंतप्रधान मोदींनी बिहारच्या मधुबनी येथील सभेत बोलत होते. यावेळी …

Read More »

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबरील या कराराला दिली स्थगिती सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर केली घोषणा

काल पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू जल करार स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी बुधवारी (२३ एप्रिल २०२५) पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. दरम्यान, सरकारने गुरुवारी (२४ एप्रिल २०२५) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मंगळवारी (२२ एप्रिल २०२५) दुपारी जम्मू आणि …

Read More »

पहलगामला गेलेल्या पर्यटकांसाठी पवारांचा पुढाकार, मुख्यमंत्र्यांकडून विमान तर शिंदे हे स्वतः जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारचा पुढाकार

पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर काम करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली …

Read More »

पहलगाम घटना; अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे सरकारने केली विशेष रेल्वेची व्यवस्था

पहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांची सोय व्हावी व वाहतूक समस्येवर तोडगा काढणे तसेच अतिरिक्त गर्दीची व्यवस्था करण्यासाठी श्री माता वैष्णो देवी (एसएमव्हीडी) कटरा येथून नवी दिल्लीकडे जाण्यासाठी विशेष रेल्वेची सेवा सुरू करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेचे तिकिट कटरा, उधमपूर आणि जम्मू रेल्वे स्थानकावर मिळेल. रेल्वे क्रमांक : …

Read More »

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी सरकारकडून हेल्पलाईन जारी हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन-संपर्क क्रमांक :- 022-22027990

पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24×7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह …

Read More »

पहलगाम येथील हल्ल्यामागे टीआरएफ संघटनेचा हातः कोणाशी संलग्नित संघटना लष्कर ए तैयब्बाची एक संघटना, कलम ३७० हटविल्यानंतर स्थापना झाली

कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यात, दहशतवाद्यांच्या एका गटाने पहलगामच्या बैसरन कुरणात पर्यटकांवर गोळीबार केला, ज्यात किमान २६ पर्यटक ठार झाले. लश्कर-ए-तैयबा (LeT) ची शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने या हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारली. एलईटीचा सैफुल्ला कसुरी हा पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार होता, तर टीआरएफ गटाचे …

Read More »

पहलगाम हल्ल्यातील तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी हल्लेखोरांमध्ये दोन काश्मिरींचा समावेश

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम कुरणात मंगळवारी (२२ एप्रिल, २०२५) दुपारी पर्यटकांची हत्या करणाऱ्या सुमारे चार ते सहा सशस्त्र दहशतवाद्यांच्या गटात दोन काश्मिरी पुरुष असल्याचा संशय आहे, असे सरकारी सूत्रांच्या हवाल्याने द हिंदूच्या संकेतस्थळाने वृत्त दिले. पुरुष पर्यटकांना लक्ष्य करून त्यांच्या धर्मावर आधारित असलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत तब्बल २६ लोक मारले …

Read More »