Breaking News

मुनगुंटीवारांचा चिमटा तर गृहमंत्री देशमुखांकडून गजल गाऊन दुःखावर फुंकर विधानसभेतील चिमट्यांनी एकच हास्यकल्लोळ

मुंबईः विशेष प्रतिनिधी

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असून मागील दोन दिवसांपासून सतत मनसुख हिरेन प्रकरणावरून विधानसभेत भाजपाने आक्रमक पवित्रा स्विकारला. त्यावरून मंत्रिमंडळात गृहमंत्री पद आपल्यालाच का मिळाले? दुसरे खाते का मिळाले नाही? असा प्रश्न कदाचित गृहमंत्री अनिल देशमुख यांना पडला असेल. तसेच मागील दोन दिवस सुरु असलेल्या गदारोळावरून तुमचे दुःख मी समजू शकतो पण ते तुमच्याच हिश्शाला आल्याचा चिमटा भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेच्यावेळी गृहमंत्री देशमुख यांना काढला. तर देशमुख यांनीही स्व.गजलगायक जगजीतसिंग यांची एक गजल म्हणून दाखवित मुनगंटीवार यांना कोपरखळी लगावली. त्यामुळे काही काळ सभागृहात एकच हशा पिकला.

तोच धागा पकडत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांची कोपरखळी तितक्याच खेळीमेळीने घेत सुधीर मुनगंटीवार यांना प्रतित्तुर देत म्हणाले की, सुधीरभाऊ देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा तुम्ही सिनियर होता. मात्र पाच वर्ष तुम्ही तुमचं दुःख लपवलं. तुमच्या मनातलं दुख आम्हाला कळत होतं. सिनियर असून मुख्यमंत्री होता आलं नाही हे तुमचं दुःख होतं. तुम्हाला पाहून मला जगजितसिंह यांची एक गझल आठवतेय असे म्हणत “तुम इतना क्यू मुसकुरा रहे हो, क्या गम है जो छुपा रहे हो, आँखो में नमी, हँसी लबो पे, क्या हाल है क्या दिखा रहे हौ”, गजल गाण्यातील ओळीच त्यांनी सभागृहात म्हणून दाखवित सुधीरभाऊ यांची अशी अवस्था होती अशी कोपरखळीही लगावली.

अनिल देशमुख यांच्या या प्रतित्तुराने मागील दोन दिवस सचिन वाझे, मनसुख हिरेन प्रकरणावरून विधानसभेत तणावपूर्ण बनलेले राजकिय वातावरण हलकंफुलकं होत सभागृहात हास्यकल्लोळ झाल्याचं पाह्यला मिळालं.

Check Also

ऑलिंम्पिक-२०२० साठी महाराष्ट्रातील हे ८ जण देशाचे प्रतिनिधीत्व करणार राज्यातील निवड झालेल्या खेळाडूंना क्रीडा मंत्री केदार यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई : प्रतिनिधी टोकीयो ऑलिंम्पिक – २०२० साठी राज्यातील निवड झालेल्या ८ खेळाडूंनी आप-आपल्या खेळामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *