Breaking News

Tag Archives: sachin waze

अनिल देशमुख यांना ईडीप्रकरणी जामीन मात्र सीबीआयप्रकरणात अद्याप नाही

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्बच्या माध्यमातून त्यावेळचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात कथित १०० कोटी वसुली प्रकरणी आरोप केले. याप्रकरणी अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मागील११ महिन्यांपासून ईडी कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना …

Read More »

शिंदे गटाच्या खासदारापाठोपाठ आशिष शेलार म्हणाले, सचिन वाझे ठाकरेंचा माणूस कागदोपत्री सिध्द झाले आहे

शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत म्हणाले की, ‘मातोश्री’वर दर महिन्याला १०० खोके पाठवले जात होते. ते बुलढाण्यातील शिंदे गटाच्यावतीने आयोजित ‘हिंदू गर्व गर्जना’ कार्यक्रमात बोलत होते.  यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली असून सचिन वाझे हे दर महिन्याला मातोश्रीवर १०० कोटी …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे यांनी वाझे-शर्मा यांच्यासोबतच्या संबंधांचा खुलासा करा महाराष्ट्राची माफी मागावी-भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी

उद्योगपती अंबानींच्या घराबाहेर स्फोटके भरलेली गाडी उभी करून मनसुख हिरेनच्या हत्या कटात माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा याचा सहभाग असल्याचा व त्यासाठी सचिन वाझे याने ४५ लाखांची सुपारी प्रदीप शर्माला दिल्याचा आरोप एनआयएने प्रतिज्ञापत्राद्वारे केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता या प्रकरणात गप्प न राहता वाझेची पाठराखण करून महाराष्ट्राचा अपमान …

Read More »

परमबीर सिंग यांच्या घरात शर्मा आणि वाझे यांची बैठक का झाली? एक दिवस एनआयएला खरं काय आहे ते सांगावं लागेल - नवाब मलिक यांचा आरोप

मराठी  ई-बातम्या टीम केंद्र सरकार व भाजपासोबत परमबीर सिंग यांचं महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे डील झाले होते, त्यातूनच अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले. आता केंद्रीय यंत्रणा परमबीर सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न करतेय मात्र एक दिवस एनआयएला खरं काय आहे हे सांगावं लागेल. सत्य जास्त दिवस लपून राहणार …

Read More »

परमबीर सिंग व सचिन वाझे भेटीमागे कोण? चौकशी करण्याची काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग व सचिन वाझे हे चांदिवाल आयोगासमोर चौकशीला जाण्यापूर्वी भेटले अशी माहिती मिळतेय हे नियमाला धरुन नाही. चौकशीला जाणारे दोन व्यक्ती वा आरोपी अशा प्रकारे भेटू शकत नाहीत अशी नियमावली आहे. मग अशा परिस्थितीत ते दोघे का भेटले? कशासाठी भेटले? याची उच्चस्तरीय चौकशी झाली …

Read More »

प्रश्न करणाऱ्या ईडीलाच काँग्रेसने पाठविली प्रश्नावली तर त्या बारमालकांना अद्याप अटक का नाही? सचिन सावंत

मुंबई : प्रतिनिधी बारमालकांकडून कथितरीत्या जमा केलेले पैसे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले असतील तर मग लाच दिल्याच्या आरोपाखाली ईडीने अद्याप त्या बारमालकांना गजाआड का केले नाही, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी करत चार प्रश्ने ईडीला विचारले. गेले सात वर्षे मोदी सरकार अस्तित्वात …

Read More »

अजित पवार, अनिल परब यांची CBI चौकशी करा ! अमित शाहना पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रातून सांगितली स्वत:ची ओळख

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रात तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत असून या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी अवैध पध्दतीने निलंबित सहाय्यक पोलिस इन्सपेक्टर असलेल्या सचिन वाझे याच्याकडून कोट्यावधी रूपये गोळा करण्याचे आदेश दिले. याप्रकरणात अजित पवार आणि अनिल परब यांची नावे वाझे याने घेतलेली असल्याने या …

Read More »

वाझेंच्या आरोप प्रकरणी मोक्का नुसार कारवाई करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, निलंबित पोलीस अधिकारी वाझे यांनी केलेल्या आरोपातून राज्यकर्तेच संघटीत गुन्हेगारीमध्ये गुंतल्याचे दिसत आहे. या प्रकरणी ज्यांचे उल्लेख होत आहेत, त्यांचे राजीनामे पुरेसे नसून संबंधितांविरुद्ध मोक्का अन्वये गुन्हे दाखल करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार …

Read More »

वाझेचे सारेच मालक चिंतेत: तो अहवाल मात्र नवाब मलिकांनीच फोडला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेना-राष्ट्रवादीला टोला

नागपूर: प्रतिनिधी सचिन वाझे प्रकरणामुळे जेवढी बदनामी महाराष्ट्राची झाली, तेवढी कोणत्याही प्रकरणाने झालेली नाही. पोलिस दलातील बदल्या, त्यासाठी पैसे घेणे, हप्ते वसुलीचे टार्गेट देणे यातून एक सिंडीकेट राज वाझेंच्या भरवशावर चालविण्यात आले. त्यामुळेच सचिन वाझेंचे सारे मालक आज चिंतेत आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना राष्ट्रवादीला लगावत पोलिस बदल्यांच्या रॅकेटचा तो …

Read More »

फडणवीसांनाच हप्ताखोरीचा अनुभव पाच वर्षात आरएसएसला किती वाटा दिला?- नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी वसुली कशी करतात? वसुलीतील वाटा किती असतो? आणि त्याचे वाटप कसे केले जाते? याचा दांडगा अनुभव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना असून ते त्यांचा अनुभव कथन करत आहेत. पाच वर्ष सत्तेत असताना मंत्रालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सर्व विभागात कसे घुसवले होते, ते किती वसुली करत होते व …

Read More »