Breaking News

इंग्लडचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांची ऋषी सुनक यांच्या मंत्रिमंडळात पुनरागमन

इंग्लडमध्ये जेव्हापासून पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले आहे. तेव्हापासून सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणावरून पंतप्रधान ऋषी सुनक यांना टीकेच्या भडिमाराला आणि वादग्रस्त घटनांना सामोरे जावे लागत आहे. या वादग्रस्त घटनेत आता आणखी एका घटनेची भर पडली असतानाच इंग्लडसह जगभरातील अनेकांना आर्श्चयाचा धक्काही बसला आहे.

सध्या सुरु असलेल्या इस्त्रायल-हमासच्या युध्दात पॅलिस्टीनी नागरिकांना इस्त्रायलच्या हिंसाचाराला सामोरे जावे लागत आहे. त्यातच ऋषी सुनक यांच्या सरकारमधील अंतर्गत सुरक्षा मंत्री सुएला ब्रेव्हरमॅन यांनी पॅलेस्टीनीच्या बाजूने लेख लिहिले. विशेष म्हणजे हे लेख लिहून प्रसिध्द करताना त्यांच्यावर डाऊनिंग स्ट्रिटची परवानगी घेतली नसल्याचा आरोप आहे. त्यासंदर्भात सुएला ब्रेव्हरमॅन यांना या संदर्भात वारंवार सांगण्यात येऊनही त्यांनी पुरेशी परवानगी घेतली नाही. त्यामुळे अखेर आज सुएला ब्रेव्हरमॅन यांची सुनक सरकारच्या मंत्रिमंडळातून उचलबांगडी करण्यात आली.

या उचलबांगडीनंतर सुएला ब्रेव्हरमॅन यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, केंद्रीय मंत्रिमंडळात रिशफल करण्यात येणार होता. त्या पार्श्वभूमीवर आपण राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान इंग्लडचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांची सुनक सरकारच्या या मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्रीपदावर नियुक्ती करत इंग्लडच्या राजकारणात पुन्हा एकप्रकारे पुनरागमन झाल्याने इंग्लडसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक बड्या नेत्यांना आर्श्चयाचा धक्का बसला. वास्तविक पाहता एकदा इंग्लडच्या पंतप्रधान या सर्वोच्च पदावर राहिलेला व्यक्ती पुन्हा त्यापेक्षा खालच्या पदावर परतत नसल्याची नैतिक प्रथा इंग्लडमध्ये पाळली जाते. मात्र सुएला ब्रेव्हरमॅन यांच्या गच्छंतीनंतर डेव्हिड कॅमरून यांची राजकारणात वापसीसाठी यावेळी अपवाद करण्यात आला आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावेळेचा तेलंगणातील तो व्हिडिओ व्हायरलः काँग्रेसची टीका

तेलंगणातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत माढिगा समाजाच्या आरक्षण वर्गिकरणाच्या मागणीसह तेलंगणाच्या विकासाबद्दल पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *