Breaking News

मनसे कार्यकर्त्ये घेतात काँग्रेसकडे “लक्ष्मी” दर्शन ! ऐका संभाषण मनसे कार्यकर्त्यांचे मनसेच्या जिल्हाध्यक्षाने काँग्रेस उमेदवाराकडून मदतीसाठी पैसे घेतल्याचे उघड

औरंगाबादः जगदीश कस्तुरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या विरोधात आगपाखड करण्यासाठी संपूर्ण राज्य पिंजून काढत आहेत. तर दुसऱ्याबाजूला मनसेच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षाने काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांच्याकडून घशघशीत रक्कम घेतल्याचे उघडकीस आले असून आर्थिक व्यवहाराची चर्चा करत असतानाचे संभाषण मराठी ई-बातम्याच्या हाती लागले आहे.
गेल्या २० एप्रिल रोजी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांना निवडणूकीत मतदान करण्यासाठी लाखो रुपये घेऊन कार्यकर्त्यांना प्रत्येकी दोन दोन हजार रु.पाकिटात घालून पाठवून दिले. निवडणूकीच्या कामासाठी केवंळ दोन हजार रु. मिळालेले पाहुन कार्यकर्ते चांगलेच संतापले. त्यांनी हा प्रकार राज ठाकरेंच्या कानावर घालण्यासाठी गेल्या एक आठवड्यापासुन प्रयत्न सुरु केले. पण शहरातील कोणताही मनसेचा जेष्ठ नेता या प्रकारात लक्ष घालण्यास तयार नाही.
हाती लागलेल्या फोनवरील संभाषणात मनसे जिल्हाप्रमुखांनी पुरसे पैसे दिले नसून आणखी पैसे देण्याचे आश्वासन पूर्ण केले नसल्याबाबतची तक्रार मनसे कार्यकर्त्ये औरंगाबादमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडे करत आहेत. तसेच याबाबत लक्ष घालण्याची विनंतीही करत आहेत.
लोकसभा निवडणूका जाहिर झाल्यापासून राज ठाकरेंनी राज्यात सहा-सात सभा घेतल्या. त्यांच्या सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर कमरेखाली टिकाही झाली. शिवसेना लाचार पक्ष असल्याचा आरोप करत त्याचा नामोल्लेखही टाळला. कोणत्याही राजकिय पक्षाच्या उमेदवाराला मदत करा पण केवळ भाजपाच्या शहा आणि मोदी यांच्या विरोधात प्रचार करा असे आदेश दिले.
यानंतर बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुपाऱ्या घेऊन काम करत नसल्याचे मोठ्या अभिमानाने सांगितले.त्याच वेळेस औरंगाबादेत मनसेच्या जिल्हाध्यक्षांचे प्रताप उघड झाले. याविषयी काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांचे प्रचारप्रमुख पवन डोंगरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे काही घडलेच नसल्याचा खुलासा केला.
या प्रकरणी अभिजित पानसे यांच्याशी संपर्क केला असता ते राज ठाकरेंच्या सभेत व्यस्त असल्याचे सांगत अधिक बोलण्याचे टाळले.

याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सुमित खांबेकर म्हणाले की, पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझी बदनामी करण्याचा कट काही लोकांनी रचला होता. त्यात ते यशस्वी झाले आहेत. याप्रकारामुळे मनसे या पक्षाचीही बदनामी झाली आहे. माझे राजकिय करिअर २००६ साली सुरु झालेलं आहे. ते घडविण्यासाठी जो खडतर प्रवास केला, त्याची जाणीव पक्षातल्या वरीष्ठ नेत्यांना आहे. त्या ऑडिओ क्लीप कोणाच्या आहेत ते मला माहीत नाही.

( खालील ऑडीओ ऐकायला विसरू नका)

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *