Breaking News

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचा दावा, निलंबनाचा प्रस्ताव विरोधकांकडूनच …

मागील जवळपास एक आठवड्याहून अधिक काळ संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना देशातील दोन तरूणांनी लोकसभा सभागृहात उड्या टाकल्याचे चित्र सर्व देशांनी पाहिल्याचे दिसले. त्यानंतर काही विरोधी बाकावरील सदस्यांनी संसदेच्या कामकाजात अडथळा आणला. पण लोकसभेचे कामकाज सुरळीत चालावे या उद्देशाने केंद्र सरकारची इच्छा नव्हती की लोकसभेतील खासदारांना निलंबित करावे अशी. पण विरोधी पक्षाच खासदारांचा प्रस्ताव घेऊन आल्याचा दावा केला.

संसदेचे हिवाळी अधिवेशनात संसद सुरक्षा भंग प्रकरणी संसदेत प्रश्न उपस्थित केला म्हणून केंद्र सरकारने विरोधी बाकावरील १४३ खासदारांना निलंबित केले. विरोधकांकडून दररोज आंदोलन करण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या विरोधात जंतर मंतर येथे आज विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत असताना केंद्रीय सांसदीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि कायदा राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सरकारची भूमिका स्पष्ट करताना विरोधकांवर आरोप केला.

केंद्रीय मंत्री जोशी म्हणाले, संसदेत मंजूर करण्यात आलेल्या तीन गुन्हेगारी (न्यायसंहिता) कायद्याच्या विरोधात न्यायालयात जाऊ शकतात जर त्यांना नव्या गुन्हेगारी कायद्याच्या मसुद्याविषयी संशय असू शकेल जो संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला.

पुढे बोलताना प्रल्हाद जोशी म्हणाले, लोकसभेतील खासदारांना निलंबित करण्याची इच्छा नव्हती. त्यांना आम्ही विनंती केली. तरीही काही खासदारांना निलंबित केल्यानंतर त्यांचे अनेक खासदार आले आणि त्यांनी विनंती केली की आम्हालाही निलंबित करा अशी मागणी केली. काँग्रेसचा स्थर आता इतका खाली घसरला असल्याचा आरोपही केला.

प्रल्हाद जोशी पुढे बोलताना म्हणाले, सरकारचे संसदेतील फ्लोअर मॅनेजरनी यापूर्वीच विरोधी खासदारांना सांगितले होते की, संसदेत कोणतेही पोस्टर, बॅनर आणू नका. तसेच या गोष्टी संसदेतील वागण्यात बेशिस्तपणा येईल. त्यावर विरोधी पक्षाच्या खासदारांनी आम्ही बेशिस्त वागू तुम्ही आमच्यावर निलंबनाची कारवाई करा असे सांगितल्याचा दावाही केला.

राज्यसभेतील ४६ आणि लोकसभेतील १०० खासदारांना आतापर्यंत बेशिस्त वागणूकीवरून विरोधी पक्षाच्या खासदारांवर निलंबनाची कारवाई केली. या सर्वांनी बॅनरबाजी आणि पोस्टरबाजी संसद केल्याने त्यांच्या बेशिस्त वर्तनावरून निलंबित केल्याची माहिती प्रल्हाद जोशी यांनी दिली.

प्रल्हाद जोशी पुढे बोलताना म्हणाले, संसदेचे हिवाळी अधिवेशन काल २१ डिसेंबर रोजीच संपले. परंतु अर्थसंकल्पिय अधिवेशन सर्वात मोठे कालावधीचे राहणार आहे. परंतु तीन राज्यातील निवडणूकांमध्ये विरोधकांचा पराभव झाल्याने त्यांना नैराश्य आल्यानेच संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु ठेवायचे नव्हते. त्यामुळेच त्यांनी हा मार्ग निवडल्याचे सांगत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे तर व्हिडिओग्राफी शुट करण्याचा आणि घटनात्मक पदावरील व्यक्तीचा अवमान घडविण्याच्या घटनेचा आनंद घेत होते. तसेच इतर विरोधी पक्षाचे खासदार या सर्व गोष्टी घडत असताना त्याचा आनंद घेत होते. त्यामुळे काँग्रेस पक्ष जेव्हा सत्तेत होता तेव्हा ते जबाबदारीने वागले नाहीत आता तर विरोधात असताना अधिक बेजबाबदार पणे वागत असल्याचा टोलाही लगावला.

 

Check Also

भ्रष्टाचारप्रकरणी अब्जाधीश महिलेला व्हिएतनाममध्ये थेट फाशीची शिक्षा

व्हिएतनामी रिअल इस्टेट उद्योजिका ट्रुओंग माय लॅन याला देशाच्या सर्वात मोठ्या फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात हो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *