Breaking News

आदित्य ठाकरे यांची खोचक टीका, ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरमधील फरकच कळत नाही

राज्यातील सरकार हे दिल्लीच्या आशिर्वादाने बसलेले सरकार आहे. या सरकारकडून दिल्लीच्या आदेशानेच मुंबईची लूट करण्यात येत आहे. त्यामुळे दोन आठवड्यापूर्वी राज्याच्या लोकायुक्तांना पत्र लिहीत मुंबईतील फर्निचर घोटाळ्याप्रकरणाकडे लक्ष वेधले. त्यानुसार लोकायुक्तांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना सुनावणीसाठी पाचारण करण्यात आल्याची माहिती युवासेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. तसेच ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरमधील फरकच घटनाबाह्य मुख्यमंत्री यांना कळत नाही अशी खोचक टीका केली.

शिवसेना आमदार तथा युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, मागच्या दोन आठवड्यापूर्वी लोकायुक्त यांना पत्र पाठवले होते. फर्निचर घोटाळा संबंधी पत्र पाठवले होते. यावर आता सुनावणी बोलावली आहे. फेब्रुवारी महिन्यात सुनावणी असेल. यामध्ये बीएमसी आयुक्तांनी सुद्धा उपस्थित रहाव. तसंच तक्रारारदार म्हणून मला सुद्धा बोलवलं असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, लोकायुक्तांना स्ट्रीट फर्निचर घोटाळा संबंधी आम्ही पुरावे दिले आहेत. मुंबईची लूट आम्ही होऊ देणार नाही. रस्ते घोटाळ्य़ा बद्दल आम्ही एक्सपोज करतोय. बीएमसीला मान्य करावे लागलं की ४०० कोटीचे वरियेशन थांबावे लागले हा सुद्धा विषय लोकायुक्त समोर आणणार आहोत असा इशारा भाजपाप्रणित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला दिला.

तसेच पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ज्या रस्त्याच कंत्राट रद्द केले ते कंत्राटदार न्यायालयात गेले आहेत. नवीन रस्त्याची निविदा काढली, त्यात ३०० कोटी कमी केले आहेत. आधीच कंत्राटदार कोर्टात गेले आणि नवीन टेंडर वर स्टे आणला आहे. ११ जानेवारी पर्यत टेंडर वर स्थगिती असल्याचे सांगत याप्रश्नी आयुक्तांसोबत चर्चा करायला तयार असल्याचे सांगत यावेळी किती रस्ते झाले ते दाखवा. रस्ते पूर्ण होणार नाहीत याला जबाबदार आपले घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत असा आरोप करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरचा फरक मुख्यमंत्री यांना कळत नाही. तुम्ही मुंबईची लूटमार दिल्लीच्या आदेशाने करताय असा खळबळजनक आरोपही केला.

एमटीएचएल घोटाळ्याप्रश्नी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, एमटीएचएलचे काम ८३ टक्के आमच्या सरकार मध्ये पूर्ण झालं आता उदघाटनला एवढा का वेळ लागतोय. हे काम अजून तयार नाही ? दीड महिना स्वतःच्या स्वार्थासाठी पेंडिंग ठेवलय. नवी मुंबई मेट्रोचे काम सुद्धा तसेच ५ महिने ठेवले. दिघा स्टेशन तयार होऊन ८ महिने झाले. पण व्हीआयपीची उद्घाटानाला वेळ मिळत नाही
घटनाबाह्य मुख्यमंत्री यांना स्वतःच्या जिल्ह्यात उदघाटन करता येत नाहीये तुम्ही राज्याचा काय करणार ? असा सवालही केला.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, एमटीएचएल, उरण लाइन, दिघा स्टेशन सुरू करण्याची मागणी करत लोकायुक्त सुनावणीवेळी मुंबई महापालिका आयुक्त उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे असा खोचक टोलाही लगावला.

Check Also

राष्ट्रपतींच्या हस्ते पहिल्या स्वदेशी ‘सीएआर- टी’ पेशीवर आधारित उपचार प्रणालीचे लोकार्पण

भारताच्या पहिल्या जनुकीय उपचार प्रणालीची सुरुवात ही कर्करोगाविरुध्दच्या लढ्यातील मोठी प्रगती आहे. ‘सीएआर-टी सेल उपचार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *