Breaking News

राहुल गांधी यांची टीका, मोदींनी तरूणांना मोबाईल बघण्याचा रोजगार दिला

काही दिवसांपूर्वी देशातील दोन तरूणांनी संसदेत उडी मारली. हे दोन तरूण कसे संसदेत आले याचे उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे नाही. पण प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा आहे ती राहुल गांधी यांनी व्हिडिओ शुट केल्याची. १५० खासदारांना निलंबित का केले असा प्रश्न कोणी विचारत नाही अशी टीका करत काँग्रेस नेते राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले, त्या आंदोलनामागे देशातील बेरोजगारीचा मुद्दा असून त्यावर पंतप्रधान मोदी काही बोलतच नाहीत असा आरोप केला.

संसद सुरक्षा भंग प्रश्नी संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभा सभागृहातील इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या १४६ खासदारांना काल संध्याकाळपर्यंत केंद्र सरकारने निलंबित केले. त्याच्या विरोधात इंडिया आघाडीच्यावतीने आज नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन केले. त्यावेळी राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, देशातील दोन तरूण संसदेत उडी मारून आले. त्यानंतर त्या दोघांनी सभागृहात काही प्रमाणात धुर निर्माण केला. त्यावेळी मी तेथेच होतो. पण स्वतःला देशभक्त म्हणविणारे भाजपाचे खासदार त्या तरूणांनी जशी उडी मारली तसे सगळे खासदार सभागृहातून पळून गेल्याचा आरोप केला.

तसेच राहुल गांधी म्हणाले, मध्यंतरी मी काही सर्व्हे करणाऱ्यांशी बोललो. की देशातील तरूण पिढी मोबाईलवर काय करत असते ? तर त्या सर्व्हेमध्ये देशातील तरूण तब्बल ७ तास ३० मिनिटे मोबाईलवर फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर, ट्विटर, व्हॉट्स अॅप वर  वेळ घालवित असल्याची खळबळजनक माहिती देत मागील ९ वर्षात मोदींनी तरूणांना काय दिले तर रोजगार नाही तर त्यांच्या हातात मोबाईल बघण्याचा रोजगार दिल्याचा आरोप केला. याशिवाय या तरूणांनी फेसबुक इन्स्टाग्रामशी जोडा किंवा इन्स्टाग्रामला फेसबुकशी जोडा आणि बघत बसण्याचा रोजगार दिल्याचा खोचक टोलाही लगावला.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, संसदेत ज्या तरूणांनी उड्या मारल्या त्या मागे बेरोजगारी हे एक प्रमुख कारण आहे. मात्र प्रसार माध्यमे तो प्रश्न अमित शाह यांना विचारत नाही. उलट विचारतायत ते राहुल गांधी यांनी संसद परिसरातील मिमिक्रीचा व्हिडिओ शुट केला. देशातील वाढत्या बेरोजगारीचा मुद्दा कोणी उपस्थित करत नाही अशी टीकाही केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *