Breaking News

या अभ्यासक्रमासाठी राज्य CET परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख जाहीर प्रथम वर्ष अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या प्रवेशासाठी १० फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज

मराठी ई-बातम्या टीम

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी-२०२२ ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.

या परीक्षेकरीता उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज दि. १० फेब्रुवारी, २०२२ ते ३१ मार्च, २०२२ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे आहेत.अर्ज सादर करण्याकरिता  आणि अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी, असे  राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने कळविले आहे.

राज्यातील आगामी शैक्षणिक वर्षासाठी विशेषत: अभियात्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी सीईटी परिक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या अभ्यासक्रमासाठी ही परिक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी १० फेब्रुवारी २०२२ पासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरण्याची शवेटची तारीख ३१ मार्च २०२२ अखेरपर्यंतची देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर परिक्षेसंदर्भातील तारीख जाहीर करण्यात येणार आहे. अभियांत्रिकी प्रवेशासाठी जवळपास सर्वच शाखांच्या प्रवेशासाठी एकदाच सीईटी परिक्षा घेण्यात येणार आहे. तर आयटी अभ्यासक्रमासाठी आणि औषधनिर्माण शास्त्र आणि कृषी विभागाच्या अंभ्यासक्रामासाठीही स्वतंत्र परिक्षा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी www.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावे असे आवाहनही राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्षाने केले.

Check Also

मतदान कार्ड नाही ? हरकत नाही यापैकी कोणतेही एक ओळखपत्र न्या

राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून १९, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *