Breaking News

युक्रेनच्या अध्यक्षांनी केले जगभरातील ज्युंना आवाहन रशियाच्या हल्ल्यात बेबीन यार होलोकॉस्ट स्मारकावर क्षेपणास्त्र

रशियाने युक्रेन विरोधात लष्करी कारवाईला सुरुवात केल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आपण यहुदी असल्याचे जाहीर करत माझे बालपण रशियात गेले असून रशियन सैन्यात वडील आणि आजोबांनी नाझी विरूध्दच्या कारवाईत सहभाग घेतल्याचे सांगितले. त्यास अप्रत्यक्ष उत्तर देताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांनी आपण ज्यु असल्याचे स्पष्ट करत युक्रेनमध्ये नाझी विचारांचे सरकार असल्याचे आणि त्या नाझी विचाराच्या सरकारला हुसकवून लावण्यासाठी लष्करी कारवाईला सुरुवात केल्याचे स्पष्ट केले.
मात्र आज मंगळवारी रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात बेबीन यार होलोकॉस्ट स्मारक उध्दवस्त झाले. त्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी जगभरातील ज्यूंना मौन सोडण्याचे आवाहन करत म्हणाले की, मी आता जगातील सर्व ज्यूंना संबोधित करत आहे. इथं काय होत आहे ते तुम्हाला दिसत नाही का?… असेच मौन राहिल्याने नाझीवादाचा जन्म होतो. त्यामुळे आपल्या नागरिकांच्या हत्येबद्दल बोला अशी साद घातली. यासंदर्भात एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने वृत्त प्रकाशित केले.
बोलताना वोलोडिमिर झेलेन्स्की मंगळवारी युक्रेनच्या किव्हमधील बेबीन यार होलोकॉस्ट स्मारकावर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यांचा संदर्भ देत होते. युक्रेनियन अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला भयानक होता आणि यामुळे राज्याच्या ब्रॉडकास्टिंगवर देखील परिणाम झाला. तसेच होलोकॉस्ट स्मारकावर झालेल्या नुकसानीची तपशीलवार माहिती घेण्यासाठी एक सुरक्षा पथक घटनास्थळी पाठवण्यात आल्याची माहिती स्मारकाच्या प्रवक्त्याने दिली.
बेबीन यार स्मारक हे ३३ हजारपेक्षा जास्त ज्यूंच्या सामूहिक कबरीवर बांधण्यात आले आहे. १९४१ मध्ये हे शहर नाझींच्या ताब्यात असताना या सर्व ज्यूंना मारण्यात आले होते. रशियाकडून युक्रेनवर हल्ला सुरूच असून आतापर्यंत शेकडो लोकांनी या युद्धात प्राण गमावले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *