Breaking News

किरीट सोमय्यांचा सवाल, कुठल्या गटारीत पुरावे टाकले? संजय राऊतांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची नौटंकी सुरुय

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेवून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे चिरंजीव नील सोमय्या यांच्यावर आरोप करत त्यासंदर्भातील सर्व पुरावे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असता त्यावरील सुणावनीवेळी संजय राऊत यांनी पुराव्या दाखल काहीही दिले नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी न्यायालयात दिला. त्यावरून किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.
उद्धव ठाकरेंचा त्यांच्याच सरकारवर कंट्रोल नाही. त्यांच्या अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांवरचा विश्वास उडाला आहे. नील सोमय्यांच्या अटकपूर्व जमिनाच्या सुनावणीवेळी मुंबई पोलिसांनी दिलेलं उत्तर उद्धव ठाकरे, दिलीप वळसे पाटील आणि संजय राऊतांना एक्स्पोज करणारा आहे. ठाकरेंनी संजय राऊतांच्या माध्यातून नौटंकी चालवली आहे. रोज पत्रकार परिषद घेऊन काहीतरी स्टंट करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
उद्धव ठाकरे आणि त्यांचे डर्टी डझन मंत्री तुरुंगात जाणार असून मंत्री नवाब मलिक गेले, अनिल देशमुख गेले, यशवंत जाधवांकडून जे बाहेर आलेय, त्याच्यातून अर्धा डझन नेते आणि महापालिकेचे अधिकारी संकटात येणार असल्याचा इशारा देत
संजय राऊतांनी आपल्याविरोधात दिलेले पुरावे मुख्यमंत्र्यांनी कोणत्या गटारीत टाकले? असा खोचक सवालही किरीट सोमय्या यांनी यावेळी केला.
संजय राऊतांनी कोणतीही तक्रार पोलिसांकडे केलेली नाही. संजय राऊतांचे दोन ट्रक भरून पुरावे मुख्यमंत्र्यांनी कुठल्या गटारीत टाकले माहीत नाही. ईडीवाल्याने ७०० कोटी घेतले, २६० कोटी घेतले असे आरोप केले होते. पण एकही कागद मिळाला नाही, असं मुंबई पोलिसांनी सांगितले.
मुंबई पोलिसांच्या अहवालातून सरकारचे कपडेच उतरले आहेत. १० दिवस एवढे आरोप केले. ७५०० कोटी गोळा केले, २६० कोटींची ईडीच्या जॉइंट कमिशनरची बेनामी गुंतवणूक, १५ कोटी लाच घेतली. अमित शाह यांना पैसे घेतले. पण एकही कागद नाही. म्हणून आता दुसरं थोतांड म्हणे पंतप्रधान कार्यालयात पुरावे दिले, मग मुख्यमंत्र्यांना दिलेले पेपर कुठे गेले? राऊत साहेब एवढे प्रचंड घाबरले आहेत, म्हणून रोज वेगवेगळे आरोप करत असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी संजय राऊतांना लगावला.

 

Check Also

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १०३२ अभियंत्यांना नियुक्तीपत्र प्रदान

राज्य शासनाच्या विविध विभागातील नियुक्तीपत्र मिळालेल्या सर्व अभियंत्यांनी प्रामाणिकपणे लोकहिताची कामे करावीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *