Breaking News

अजित पवार म्हणाले, नवाब मलिकांचा राजीनामा न घेण्यावर सरकार ठाम, मात्र… अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे वक्तव्य

सध्या ईडी कोठडीत असलेल्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून भाजपाकडून आंदोलन इशारा आणि सभागृहाचे कामकाज चालवू देणार नसल्याचा इशारा देण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, मलिक यांचा राजीनामा न घेण्याबाबत राज्य सरकार ठाम आहे. मात्र सध्या उच्च न्यायालयात सुणावनी सुरु असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तशीच भूमिका घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सह्याद्री अतिथीगृहात चहापानाचा कायर्क्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळई महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते. सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमवर विरोधकांचा बहिष्कार होता.
मलिक यांचा राजीनामा होणार नसल्याचेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सांगितले. जुन्या सरकारमधील घोटाळ्यांच्या चौकशांसाठी महाविकास आघाडी सरकार ‘अॅक्शन मोड’ मध्ये असल्याचे सांगत अजित पवार यांनी विरोधकांनाही इशारा दिला.
एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. मात्र, मलिक यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आधीच भूमिका घेतली आहे. मुळात, मलिक यांची अटक बेकायदेशीर असल्याची बाजू त्यांनी मांडली. त्यासंदर्भात गुरुवारी सुनावणी आहे. न्यायालयाचा निकालाकडेही राज्य सरकारचे लक्ष आहे. निकाल जर विरोधात गेला तर त्याबाबत राज्य सरकार विचार करेल आणि निर्णय घेईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, अधिवेशच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठकही झाली. या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २५ मार्चपर्यंत चालणार आहे. परंतु, त्याबाबतचा अंतिम निर्णय संसदीय कामकाज सल्लागार समितीचा राहणार आहे. मागील अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पुरेसा वेळ नव्हता. मात्र, या अधिवेशन निवडणूक होईल. त्यासाठी राज्यपाल सकारात्मक भूमिका घेतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शंभर टक्के उपस्थित राहणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. हिवाळी अधिवेशनातही ठाकरे येणार असल्याचे सांगून त्याबाबत लिहून देऊ का, अशी विचारणा पवार यांनी पत्रकारांना केली होती. तरीही मागील अधिवेशनात ठाकरे आले नव्हते. त्यामुळे आता ते येणार असल्याचेही पवार यांनी पुन्हा एकदा सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जाब विचारणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. राज्यपालांची सहज भेट होत नाही. मात्र, कधी तरी चहा घेताना त्यांना विचाणार असल्याचे सांगत युक्रेनच्या राजधानीचे नाव चुकल्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाचा उल्लेख टाळून पवार यांनी टोला लगावला. ‘काही माहिती नसेल तर बोलू नये. उगाचच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Check Also

संजय राऊत म्हणाले; कोणीही असो, आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही शिवसेनेचा उमेदवार देऊन निवडूण आणू

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांना शिवसेनेत आल्यानंतर उमेदवारी जाहिर करण्याची अट शिवसेनेकडून घालण्यात आली. …

Leave a Reply

Your email address will not be published.